Cooperative News : नरहरी झिरवाळ म्हणतात, नागपूर अधिवेशनात जिल्हा बँकेचा प्रश्न सोडवेन!

Cooperative societies are in trouble due to NDCC bank in Nashik-जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी जिल्हा बँकेत ठेवलेल्या पतसंस्थांच्या ठेवी
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

NDCC Bank News : राजकीय नेत्यांच्या अनिर्बंध व वादग्रस्त कारभारामुळे नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली. आता त्या बँकेत ठेव ठेवलेल्या सहकारी पतसंस्थांदेखील संकटात सापडल्या. या पतसंस्थांच्या संचालकांनी आता राजकीय नेत्यांचा धावा सुरू केला आहे. (Narahari Zirwal assures society directors on NDCC bank stuck deposits)

जिल्ह्यातील (Nashik) पतसंस्थांच्या (Copoerative) पदाधिकारी, कर्मचारी वर्गासाठी एकदिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी झिरवाळ (Narhari Zirwal) बोलत होते.

Narhari Zirwal
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, मी स्वतः सहकारमंत्री व सहकार सचिवांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर पतसंस्थांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी पाठपुरावा करेल. त्यासाठी येत्या नागपूर अधिवेशनातदेखील प्रयत्नशील राहील.

विविध संचालकांनी झिरवाळ यांची भेट घेतली. याबाबत जिल्ह्यातील पतसंस्थांचे कार्य समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. पतसंस्थांच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकलेल्या आहेत. याची जाणीव असून, जिल्हा फेडरेशन याबाबत सतत पाठपुरावा करत आले आहेत.

जिल्हा बँक वाचविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असून, ठेवीसाठी मी स्वतः लढा देईल, अशी ग्वाही राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.

Narhari Zirwal
Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

या वेळी आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ शेखर चरेगावकर, सहायक निबंधक अर्चना सौंदाणे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायणराव वाजे, उपाध्यक्ष भारत कोठावदे, डॉ. अश्विनी बोरस्ते आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com