Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

BJP Leader Girish Mahajan Claim: गिरीश महाजन म्हणाले, शिवसेना नाटक करायला लागली तेव्हा शरद पवारांसोबत भाजपने बैठका केल्या होत्या.
Girish Mahajan & Sharad Pawar
Girish Mahajan & Sharad PawarSarkarnama

Maharashtra Politics: राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने धक्कादायक राजकीय विधाने केली. ते म्हणाले, ‘२०१४ ते २०१९ या कालावधीत शरद पवार यांचा आम्हाला पाठिंबा नव्हता का?. जेव्हा शिवसेना थाेडी नाटकं करायला लागली, तेव्हा शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा देऊ केला होता’

भाजप (BJP) नेते महाजन (Girish Mahajan) नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी भाजप-शिवसेनेचे २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात जे सरकार होते. त्याला शरद पवार (Sharad Pawar) यांचा पाठिंबा होता.

Girish Mahajan & Sharad Pawar
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१४ ते २०१९ शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का? तेव्हा तर पवार साहेबांनी सांगितले होते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहोत. शिवसेना जेव्हा थोडी नाटकं करायला लागली होती. तेव्हा २०१९ ची निवडणूक झाल्यावर त्यांनी चार-चार वेळा दिल्लीत भाजप नेत्यांशी मीटिंग केल्या होत्या.

ते पुढे म्हणाले, त्याचवेळी अजित पवार यांचा पहाटेच्या सुमारास बहुचर्चित शपथविधी झाला होता. तेव्हा मात्र ती भाजपची खेळी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र खरी गुगली शरद पवार यांनीच टाकली होती.

Girish Mahajan & Sharad Pawar
Shinde Group Vs Sanjay Raut : राऊतांची 'ती' टीका झोंबली, शिंदे गटाकडून जशास तसा पलटवार; "त्यांच्या तोंडाला 'एचआयव्ही'..."

महाजन यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी अनेक विधाने केली. अजित पवार म्हणाले, त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाने भाजपला २०१४ मध्ये उघड पाठिंबा दिला होता, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, म्हणून तर आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला होता. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com