Gautam Thakur
Gautam ThakurSarkarnama

आर्थिक विषमता हटविण्याची क्षमता केवळ सहकारात!

गौतम ठाकूर यांच्या उपस्थितीत डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोदावरी बँकेतर्फे प्रेरणा दिन संपन्न.
Published on

नाशिक : देशात (India) शंभर वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता (Economical inequality) होती, ती अद्यापही तशीच आहे. तत्कालीन सावकार व अन्य घटकांच्या लुटमारीमुळेच सहकारी बँकांची (Co-operative banks) निर्मिती झाली. तिला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी सहकारी बँकांनी लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील सर्वांत मोठी वित्तीय संस्था असलेल्या सारस्वत सहकारी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर (Guatam Thakur) यांनी केले.

Gautam Thakur
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

गोदावरी अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बँकेतर्फे झालेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या.

Gautam Thakur
मेवानींच्या अटकेच्या वादाचे मुंबईत पडसाद; काॅंग्रेस नेते राजभवनावर

यावेळी श्री. ठाकूर म्हणाले, शंभर वर्षापूर्वी राजे, जमीनदार, सरदार, सावकार यांच्याकडेच अधिकाधिक संपत्ती एकवटली होती. आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. देशातील १ टक्का अति श्रीमंताकडे एकूण उप्तन्नापैकी २२ टक्के व एकूण संपत्तीपैकी ३२ टक्के संपत्ती आहे. तर, पन्नास टक्के नागरिकांकडे १३ टक्के उत्पन्न व केवळ ६.५ टक्के संपत्ती आहे. काल आणि आजही असलेली ही विषमता दूर करण्यासाठी सहकाराशिवाय अन्य पर्याय नसल्याचे गौतम ठाकूर यांनी सांगितले.

सहकारात ३ टक्के लोकसंख्या

बँकेच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या अमडता पवार यांनी प्रास्ताविकातून सहकारी बँकांपुढील अडचणी विशद केल्या. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सहकारी तत्त्वावरील बँकांची निर्मिती झाली, असे सांगून श्री . ठाकूर यांनी आज देशातील ९४ टक्के बँका या सहकारी तत्त्वावरील असल्याचे सांगितले. मात्र देशभरातील पंधराशे सहकारी बँका फक्त ३ टक्के बँकिंग करतात, असे शल्यही त्यांनी बोलून दाखविले. सहकारी क्षेत्रात आपुलकी असल्याचे सांगून ज्यांच्यापर्यंत अद्याप बँका पोचल्याच नाहीत अशा १८ कोटी नागरिकांपर्यंत सहकार पोचावा, अशी अपेक्षा श्री. ठाकूर यांनी व्यक्त केली.

यावेळी बँकेच्या अध्यक्षा आर्किटेक्ट अमृता पवार, मानद कार्यकारी संचालक प्रणव पवार, ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी, सहकार भारतीच्या अध्यक्षा डॉ. शशीताई आहिरे, अजय ब्रम्हेचा, वसंतराव खैरनार, विश्‍वास ठाकूर, प्रणव पवार, सुरेश पाटील यांसह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com