
Nashik Politics : नाशिकमध्ये महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने नाशिक मनपात 'शंभर प्लसचा' अर्थात शंभरहुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपमध्ये एकीकडे मोठी इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
येथील भाजपचे माजी मंडलाध्यक्ष हेमंत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी माजी नगसेविका संगीता गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोमवारी (ता. २०) रोजी दोन्ही पती-पत्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
हेमंत गायकवाड हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड मनसेतच होत्या त्या नगरसेवक झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना प्रभाग क्रमांक २० मधून तिकीट दिलं. तेथेही संगीता गायकवाड निवडून आल्या व नगरसेवक झाल्या. आता हे दोघेही पती पत्नी पुन्हा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करत आहेत. त्यामुळे नाशिक रोडच्या राजकारणाची समीकरणे बदल्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने हेमंत गायकवाड व त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच रोहन देशपांडे यांनीही गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, भाजपसाठी हा धक्का असला तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरे गटासाठी मात्र सुखावणारे आहे. भाजप व शिंदे गटाने महापालिकेच्या मिशनसाठी मोठ्या प्रमाणात ठाकरे सेनेचे शिलेदार आपल्या गळाला लावत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. भाजप व शिंदे सेनेने जणू ठाकरे सेना खाली करण्याचा चंगच बांधला. त्यामुळे नाशिकमधील ठाकरे सेना काहीशी खिळखिळी झाली. परंतु या पक्ष प्रवेशाने नवी उभारी ठाकरे सेनेला मिळाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.