CPI News : आता ‘भाजप हटाव’ हाच खरा पर्याय!

भूमिहिनांना हुसकावण्याचा भाजपच्या सरकारचा प्रयत्न सुरु आहे.
CPI leader Raju Desale
CPI leader Raju DesaleSarkarnama

BJP Removal campaign : साकोरा येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने प्रकल्पाच्या जागेवर जमीन कसत असलेल्या भूमिहीनांना हुसकावून लावण्यासाठी शासकिय यंत्रणेचा गैरवापर केला जात असून, केंद्र व राज्य सरकार शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरण राबवत आहे. असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजू देसले यांनी येथे केला. (BJP is missusing government machinery)

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (CPI) ‘भाजप (BJP) हटाव, देश बचाव व भाजप (BJP) हटाव महाराष्ट्र (Maharashtra) बचाव’ या देशव्यापी जनजागरण मोहिमेला नांदगाव (Nandgaon) येथे सुरवात झाली.

CPI leader Raju Desale
Nashik District Bank issue : प्रभावशाली, बडे थकबाकीदारांमुळेच जिल्हा बँक संकटात

ग्रामीण भागातून भाजप विरोधी जनजागृती मोहिमेला सुरवात करण्यात आली. श्री. देसले यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा, भाकपच्या कार्यकर्त्यांनी जुन्या पंचायत समिती कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढली. तिची सांगता जुन्या तहसीलसमोर करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देसले म्हणाले, की भाजपची जोवर देशात सत्ता आहे, तोवर शेतकरी, शेतमजूर व कामगारांना त्यांचा न्यायिक हक्क मिळणार नाही.

श्री. देसेल म्हणाले, भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटित होऊन हा लढा रस्त्यावर न्यावा लागणार आहे. कांदा मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात आहेत.

CPI leader Raju Desale
Shivsena Nashik news : शिंदे गटाच्या आक्रमकतेने भाजप आमदार अस्वस्थ!

शेतकरी कसत असलेल्या जमीन नावावर होत नाहीत. योजना कर्मचारी, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, ग्राम रोजगार सेवक, शालेय पोषण आहार कर्मचारी आदी कंत्राटी कर्मचारी, योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतनसुद्धा मिळत नाही. जूनी पेन्शन योजना नाकारली जात आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. यामुळे हे सरकार २०२४ ला पराभूत केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. भाकप नेते भास्कर शिंदे, मनोहर पगारे, भीमा पाटील, देविदास भोपळे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com