Dada Bhuse & Rahul Dhikale
Dada Bhuse & Rahul DhikaleSarkarnama

Shivsena Nashik news : शिंदे गटाच्या आक्रमकतेने भाजप आमदार अस्वस्थ!

प्रत्येक कामाचे श्रेय घेण्याच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे भाजप नेते त्रस्त झाले.

Nashik BJP News : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपची युती होऊन सरकार स्थापन झाले असले तरी नाशिक शहरात मात्र दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीपर्यंत हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने एकमेकांच्या प्रभागातील ढवळाढवळ व कामांचे श्रेय लाटण्यासंदर्भातील तक्रारी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोचविण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Leaders complain about Shinde group activity to BJP leaders)

राज्यात (Maharashtra) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आघाडीचे सरकार आहे. मात्र नाशिक (Nashik) शहरात या दोन्ही पक्षांत कुठेहीसमन्वय नाही. त्यामुळे त्यांच्यात कामाचे श्रेय घेण्यावर वाद होत आहे. त्यातून भाजपचे शहरातील आमदार अस्वस्थ झाले आहेत.

Dada Bhuse & Rahul Dhikale
Nashik APMC election : पिंगळे, चुंभळे लढतीत प्रचाराच शेवटपर्यंत दहशतीची चर्चा!

मागील वर्षाच्या जून महिन्यात राज्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला दिले. एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत येणाऱ्या माजी नगरसेवकांना आर्थिक बळ दिले जात आहे.

शिंदे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी देणे, त्याचप्रमाणे शहरातील धोरणात्मक विषयासंदर्भात निर्णय घेऊन त्याचे श्रेय लाटण्याचे सध्या प्रकार सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युती होईल का नाही, हे अद्याप सांगता येत नसले तरी भाजपचे माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पूर्वीपासून ज्या भागात काम करत आहे तेथे शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार जोरकसपणे प्रयत्न करत असल्याने तेथे वाद निर्माण होत आहे. असे जवळपास 15 ते 16 प्रभाग आहे, जिथे भाजपचे नगरसेवक असून तेथे शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. अशा ठिकाणी वाद निर्माण होत आहे.

Dada Bhuse & Rahul Dhikale
Pune APMC Election 2023: बाजार समिती निवडणुकीला गालबोट; श्री शिवाजी मराठा सोसायटी मतदान केंद्रावर गदारोळ

आमदारांमध्ये खदखद

गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीसाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक होऊन गोदावरी आरतीसाठी निधी देण्याचेदेखील निश्चित झाले असताना खासदार हेमंत गोडसे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजपमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

पूर्व विधानसभा मतदारसंघात मखमलाबाद येथे स्थानिक आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडून निधी मंजूर झाला असताना खासदार गोडसे यांच्याकडून खासदार निधीचे बोर्ड लावले गेल्याने तेथेही संघर्ष पाहायला मिळाला. क. का. वाघ महाविद्यालयासमोर बांधण्यात आलेला उड्डाणपूल, गोविंदनगर येथील बोगदा विस्तारीकरण याचे श्रेयदेखील खासदार गोडसे यांच्याकडून घेतले जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.

Dada Bhuse & Rahul Dhikale
Nana Patole;तर असा असेल Congress चा plan B | Politics | Maharashtra | Sarkarnama

मनपा कामकाजावर शिंदे गटाचे वर्चस्व

दत्तमंदिर ते द्वारका यादरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्याचेदेखील श्रेय शिंदे गटाकडून घेतली जात आहे. नाशिक रोडमध्ये बिटको परिसरात चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाची वाट धरली. मात्र तेथे विद्यमान भाजपचे चार माजी नगरसेवक असल्याने तेथे भाजपसाठी शिंदे गट डोकेदुखी ठरू लागला आहे. अशीच परिस्थिती पाथर्डी फाटा, गंगापूर रोड, वडाळा, कामटवाडे परिसर व इंदिरानगर भागात आहे.

नाशिक शहरामध्ये भाजपचे तीन आमदार आहे असे असले तरी महापालिकेच्या कामकाजावर मात्र शिंदे गटाच्या नेत्यांचे वर्चस्व ही बाबदेखील भाजपच्या नेत्यांना खटकत आहे. महापालिका आयुक्तांसह महापालिकेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरदेखील शिंदे गटाच्या नेत्यांचा पगडा असून, भाजपच्या आमदारांसह वरिष्ठ नेते व माजी नगरसेवकांनादेखील अधिकारी जुमानत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

Dada Bhuse & Rahul Dhikale
Amit Shaha News : अमित शाह दक्षिण दिग्विजयावर : काँग्रेस शह देणार का?

अंतर्गत खदखद वरिष्ठांपर्यंत

शिंदे गटाकडून सुरू झालेल्या श्रेयवादाची खदखद भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविण्यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. शिंदे गटाकडून अतिक्रमण होत राहिल्यास भाजपला परवडणारे नाही, अशी भावना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवली जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी हीच संधी आहे. कोणाला काय वाटेल हे पाहत बसले तर संघटना वाढणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com