New Delhi : नव्या संसद भवनातील भेटीचा फोटो खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, एकत्रित फोटो ट्विटरवर टाकल्याबाबत पवारांनी पटेल यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sharad Pawar ask to question Praful Patel who tweeted photo of the meeting)
सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून कामकाज नव्या संसद भवनात सुरू आहे. महिला आरक्षणाला लोकसभा आणि राज्यसभेत परवानगी मिळाली आहे. नव्या संसद भवनातील पहिल्या दिवशी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाली. त्या भेटीचा फोटो पटेल यांनी सोशल मीडियावर टाकला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. बंडानंतर काही दिवसांनी पवारांनी बंडखोरांना आपला फोटो वापरू नये; अन्यथा न्यायालयात खेचण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर अजितदादा गटाने पवारांचा फोटो वापरणे बंद केले आहे.
संसद भवनातील भेटीचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याबाबतची विचारणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार पटेल यांना केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या दिवशी भेट झाल्यानंतर पवार यांनी पटेल यांना याबाबतची विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे. पटेल यांनी मात्र पवारांनी विचारणा केल्यानंतर कोणतेही उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी नेमके काय ट्विट केले होते?
शरद पवारांची नव्या संसद भवानात भेट झाल्याचा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "नवीन संसद भवनातील आजचा दिवस ऊर्जेप्रमाणे उत्साहित राहिला. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्याने आणखीनच खास बनला. तसेच कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा, असा आजचा दिवस आहे", असे प्रफुल्ल पटेलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.