Nashik Mayor Politics: गिरीश महाजनांच्या मनात चाललंय तरी काय? महापौरपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर!

Curiosity about BJP Girish Mahajan's decision to elect Nashik NMC Mayor -महापौर पद महिला राखीव झाल्याने स्पर्धा कमी मात्र राजकारण अधिक अशी भाजपची स्थिती.
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: नाशिक महापौरपदाची निवडणूक येत्या सहा फेब्रुवारीला होणार आहे. महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे. मात्र उमेदवारीचा निर्णय सातत्याने लांबणीवर पडत आहे.

नाशिक महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक ७२ नगरसेवक आहेत. ही संख्या बहुमतापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने महापौर, उपमहापौर ही निवडणूक एक सोपस्कार एव्हढेच त्याचे महत्व आहे. भाजप उमेदवार कोण? याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापौरपदासाठी तीन महिला इच्छुक आहेत. या तिन्ही इच्छुकांसाठी त्यांच्या कुटुंबीय आणि पाठीराखांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला आहे.

Girish-Mahajan
Tribal Long March: गिरीश महाजन यांची मध्यस्थी यशस्वी; आदिवासींचे लाल वादळ मुंबईत शिरण्याआधीच माघारी फिरले!

नाशिकसह धुळे आणि जळगाव या तिन्ही महापालिकांचे महापौर उमेदवार ठरविण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख भूमिका आहे. नाशिकला हिमगौरी अडके, दिपाली कुलकर्णी आणि दिपाली गीते या तीन इच्छुक उमेदवार आहेत. इच्छुक कमी असूनही लॉबिंग मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

Girish-Mahajan
Shivsena UBT Politics: ठाकरेंच्या गटनेतेपदी निष्ठावंत केशव पोरजे; शिवसेना महापालिकेत आक्रमक होणार!

यासंदर्भात महापौरपदाचा उमेदवार कोण? हा निर्णय लांबणीवर पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे सर्वच नेते व्यस्त झाले होते. त्यामुळे हा निर्णय आता दोन दिवसांनी घेतला जाणार असल्याचे कळते.

दरम्यान भाजपने बहुमत असल्याने सर्व पदे आपल्याकडे ठेवावीत की महायुतीच्या घटक पक्षांना सत्तेत सामील करावे, याविषयी भिन्न मतप्रवाह आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे २९ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांना सत्तेत सामायिक केल्यास भाजपला काही पदांवर पाणी सोडावे लागणार आहे.

महापौरपदाची निवडणूक जवळ आल्याने नगरसेवक उमेदवारी कोणाला? यावरून अस्वस्थ झाले आहेत. गटनेतेपदी भाजपने शाम बडोदे यांची निवड केली आहे. ज्येष्ठ आणि प्रभावी नगरसेवक असताना अनपेक्षित निर्णय झाला.

गटनेते पदाप्रमाणेच निर्णय महापौरपदाचा उमेदवार ठरविताना होतो की काय? याची चर्चा सुरू झाली आहे. हे सर्व राजकारण अनिश्चित असल्याने जलसंपदा मंत्री महाजन काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे आणि विशेषता भाजपच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com