Dada Bhuse : शिवसेना शिंदे पक्षाचे काय आहे ऑपरेशन महाविकास आघाडी?

Nashik Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक मध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का देणार?
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या यशा नंतर आभार दौरा करीत आहेत. येथे शुक्रवारी १४ फेब्रुवारीला नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे.

या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूचक शब्दात शिवसेनेची भावी दिशा स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होणार की नाही हे सांगता येत नाही. त्याबद्दल मी फार काही बोलू शकणार नाही. मात्र नाशिकमध्ये ऑपरेशन महाविकास आघाडी घडणार हे नक्की आहे.

Dada Bhuse
Eknath Shinde : शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला दिल्लीतून धक्का, दोन नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १४ फेब्रुवारीला सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांचा प्रवेश होऊ शकेल. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहे.

Dada Bhuse
Nashik Crime: ड्रग्सने आवळला युवा पिढीला विळखा, व्यसनाधिनांचा खुले आम गोंधळ!

शिवसेना शिंदे पक्षाचे अनेक पदाधिकारी शहरात नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त नेत्यांचा प्रवेश घडवून महायुतीमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे पक्षाचा आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट सक्रिय आहे. नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा शहरात फारसा प्रभाव दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाने आधीच राजकीय पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकचे पालकमंत्री कोण यावरून देखील शिवसेना शिंदे गट आक्रमक आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांना पालकमंत्री घोषित केले होते. मात्र त्याला प्रखर विरोध करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हरकत घेतल्यावर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप काहीसा सावध झाला आहे.

पालकमंत्री कोण हा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील महत्त्वाचा विषय असणार आहे. यासंदर्भात सध्या शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजप यांच्यात अंतर्गत कुरबुरी असल्याचे लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिकचा दौरा सहकारी पक्षांबरोबरच प्रतिस्पर्ध्यांना काय संदेश देतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com