Dada Bhuse Politics: मौलाना मुफ्ती यांचा आरोप, बोगस शिक्षक भरतीच्या रॅकेटद्वारे दहा कोटीचा भ्रष्टाचार!

Dada Bhuse; MIM MLA Maulana Mufti allegation Bogus teacher recruitment scam, 10 crores of grant embezzled- मालेगावसह राज्यात शाळेच्या शिपायापासून तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत
MIM Mualana Mufti
MIM Mualana MuftiSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: गैरव्यवहार आणि विविध कारणाने शिक्षण विभाग सतत चर्चेत असतो. 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुक्ती यांनी शिक्षण विभागाची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. शिक्षण विभागात बोगस शिक्षक नियुक्तीचे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला. विधिमंडळात उपस्थित झालेले या प्रश्नावर मौलाना मुफ्ती यांनी गंभीर आरोप केले. याबाबत मंत्री दादा भुसे यांनी विविध तक्रारी मिळाल्या आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बोगस शिक्षक भरती बाबत एस.आय.टी. ची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मालेगाव महापालिकेत बोगस शिक्षक नियुक्तीचे रॅकेट कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात येथे दहा शिक्षक बोगस नियुक्ती करून नेमले आहेत. अशाप्रकारे बोगस शिक्षकांची नियुक्ती करून राज्य शासनाचे कोट्यावधींच्या अनुदान हडप केले जाते. याविषयी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

MIM Mualana Mufti
Kunal Patil Politics; कुणाल पाटील म्हणतात, वडील रोहिदास पाटील यांनीही भाजप प्रवेशाला विरोध केला नसता!

शाळेच्या शिपायापासून तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट कार्यरत आहेत. बोगस कागदपत्र आणि जाहिरातींच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात येते. या नियुक्तीतील शिक्षकांच्या नावे राज्य शासनाकडून कोट्यावधींच्या अनुदान घेण्यात येते. हा सर्व भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप मौलाना मुफ्ती यांनी केला.

यामध्ये विविध शिक्षण संस्था चालकांचे हितसंबंध गुंतले आहेत. कायदा धाब्यावर बसून राजदूषपणे होणारे हे कामकाज थांबविणे सरकारची जबाबदारी आहे. अशाप्रकारे नियुक्त करून शासनाचे अनुदान हडप करणे याबाबत शासन काय कार्यवाही करणार अशी विचारणा आमदार मुफ्ती यांनी केली.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी आलेल्या तक्रारीची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरू आहे. बहुतांशी गैरप्रकारांमध्ये संस्थाचालकच सहभागी असतात. त्यामुळे एसआयटी मार्फत त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com