Nashik and Dindori constituency News: महायुतीने यंदा लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. तसेच गेले महिनाभर या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिस्तबद्ध यंत्रणा उभी करून जोरदार प्रचार झाल्याचा दावाही महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराविषयी 'सरकारनामा'ला माहिती दिली.
दादा भुसे म्हणाले, 'महायुतीच्या प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेने चांगले नियोजन केले होते. वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहाय्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास असा तिहेरी संगम महायुतीच्या प्रचारात आम्ही निर्माण केला होता. त्याचा खूप मोठा फायदा आमच्या दोन्ही उमेदवारांना झालेला दिसत आहे.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचबरोबर 'या सबंध प्रचारात मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आवडलेले दिसले. अनेक मतदारांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ झाल्याचे सांगितले. त्यामुळे महायुती विषयी मतदारांमध्ये अतिशय सकारात्मक भावना होती. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मतदारांनी ठरवलेले आहे. त्यामुळे सर्व सभांना आणि प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.' असंही ते म्हणाले.
'केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांची मतदारांना माहिती देण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला होता. व्यक्तिगत आणि राजकीय आरोपांना थारा न देता गेल्या दहा वर्षांत मतदार संघामध्ये अनेक विकास कामे झाली. रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. सध्याच्या राज्य सरकारकडून नागरिकांसाठी अनेक चांगली कामे सुरू आहेत. त्यावर प्रचारात भर देण्यात आला.
यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांनी वेळ दिल्यामुळे प्रचाराचा प्रभाव पडला. या सगळ्यांचा मोठा फायदा नाशिकमध्ये खासदार गोडसे आणि दिंडोरी मतदार संघात डॉक्टर भारती पवार यांना झालेला दिसला.' असंही दादा भुसे यांनी सांगितलं.
याशिवाय 'काही विरोधी नेत्यांनी या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप करून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांचा नाम उल्लेख टाळत सांगितले. मंत्री भुसे म्हणाले, कांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर देखील विरोधकांनी राजकारण केले. मात्र त्यांच्या या राजकारणाला योग्य आणि समर्पक उत्तर आम्ही दिले आहे.
कांदा निर्यातबंदी बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन केंद्र शासनाने दिले आहे. कांद्याचे प्रश्न दर दोन पाच वर्षांनी निर्माण होतच असतो. त्यावर राजकारण करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर आमचा भर असणार आहे. ही निवडणूक झाल्यावर आमचे दोन्ही विजयी उमेदवार नक्कीच शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर काम करतील.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.