Deepak kesarkar Politics: दीपक केसरकर यांचा संजय राऊत यांना टोला, म्हणाले, खरी शिवसेना आमचीच, तुमची नाही!

Deepak Kesarkar's reply to Sanjay Raut, Real Shiv Sena belongs to Eknath Shinde, People with Eknath Shinde only -दीपक केसरकर म्हणतात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जनतेने नाकारले
Deeoak Kesarkar & Sanjay Raut
Deeoak Kesarkar & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Deepak kesarkar Vs Sanjay Raut News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठावंतांचीच शिवसेना खरी, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून त्याला उत्तर देणण्यात आले.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. खासदार राऊत यांना पक्षात आणि लोकांमध्ये फारसे महत्त्व नाही. महत्व मिळावे म्हणूनच त्यांचा सर्व आटापिटा असतो.

खरी शिवसेना कोणती आणि कोणाची? हे विचारण्याचा अधिकार खासदार राऊत यांना आहे का? असा प्रश्न केसरकर यांनी केला. संजय राऊत रोज विविध आरोप आणि तथ्यहीन माहिती देऊन माध्यमांचे लक्ष वेधतात. हा सर्व खटाटोप कशासाठी सुरू आहे हे सांगण्याची गरज नाही, असे आमदार केसरकर म्हणाले.

Deeoak Kesarkar & Sanjay Raut
Tribal Birhad Morcha: धक्कादायक; सरकारी उदासीनतेचा बळी, आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील युवकाने संपवले जीवन!

खरी शिवसेना आमची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि जनतेने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह देखील आमच्याकडेच आहे, हे राऊत यांनी विसरू नये.

Deeoak Kesarkar & Sanjay Raut
Nilesh Lanke Vs BJP Sujay Vikhe : काहींची पुरती जिरली तरी..; खासदार लंकेंनी विखेंना डिचवलं

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार आमचे निवडून आले आहेत. खासदार सुद्धा आमचेच आहेत. त्यामुळे जनतेने खरी शिवसेना कोणाची, उत्तर मतदानातून दिले आहे, असा दावा केसरकर यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष लवकरच भाजप मध्ये विलीन होईल असे विधान केले होते. हे विधान शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेत्यांना चांगलेच झोंबले. त्यामुळेच आमदार दीपक केसरकर यांनी खासदार राऊत यांची हजेरी घेतली.

यानिमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा दिवचले आहे. दोन्ही शिवसेनांमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलीच जुंपली आहे. यामुळेच आमदार केसरकर यांनी राऊत यांना डीवचले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com