Tribal Birhad Morcha: धक्कादायक; सरकारी उदासीनतेचा बळी, आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील युवकाने संपवले जीवन!

Tribal protester took poison, victim of government's indifference, protest against contractual appointments-आश्रम शाळांमध्ये कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ कर्मचारी नेमण्याचे धोरण साठ दिवसांपासून सुरू आहे बिऱ्हाड आंदोलन.
Trible Birhad Agitation
Trible Birhad AgitationSarkarnama
Published on
Updated on

Tribal Birhad Morcha News: राज्य शासनाने आदिवासी आश्रम शाळांमध्ये बाह्यस्त्रोत भरतीचा निर्णय घेतला. त्यात १७९१ आदिवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचे पडसाद उंटू लागले आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी हा निर्णय घेतला. त्या विरोधात ६० दिवसांपासून नाशिकला बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. हे कर्मचारी कुटुंबासह आदिवासी भवन समोर रस्त्यावर वास्तव्याला आहेत. या आंदोलकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले.

शासन आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. सध्या या कर्मचाऱ्यांवर ३१ कोटी रुपये खर्च होतात. अह्य स्त्रोत भरतीतून दोन संस्था नवी भरती करणार आहे. साठी ८१ कोटी रुपये खर्च येणार आहे. असणाला पन्नास कोटींचा गुरुदंड बसणार आहे, अशी माहिती आदिवासी आंदोलनाचे नेते ललितकुमार चौधरी यांनी दिली.

Trible Birhad Agitation
Anjali Damania On Rohit Pawar : जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा? अंजली दमानियांनी व्हिडिओ शेअर केला!

राज्य शासनाच्या भूमिकेला आंदोलक कंटाळले होते. दोन महिने रस्त्यावर आणि भर पावसात आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार त्याची दखल घेत नाही. त्याला कंटाळून गौरव अहिरे या आंदोलकांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे.

Trible Birhad Agitation
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांना राष्ट्रवादीचे उत्तर, तुमची ओळख कोणामुळे हे विसरू नका!

गौरव अहिरे गेले दोन महिने आंदोलनात सहभागी होता. मंगळवारी निराश होऊन तो गावी गेला. तिथेच त्याने विषारी पदार्थाचे सेवन केले. गेले पाच दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील या दुर्दैवी घटनेने आंदोलक संतप्त आहेत. विविध आदिवासी संघटना या मोर्चाला पाठिंबा देत आहे. घटनांकडून राज्य शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यात आला आहे. संघटना पुढे काय भूमिका घेतात याची आता उत्सुकता आहे.

या मोर्चाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या दोन महिन्यांपासून भेटीसाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता.

याबाबत गेल्या आठवड्यात आदिवासी विकास मंत्री डॉ उईके यांच्या समवेत आंदोलकांची चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत देणारे आश्वासन मंत्री शासकीय जीआर च्या माध्यमातून देण्यास तयार झाले नाही. त्यामुळे आंदोलक आणि सरकारची चर्चा फिसकटली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com