Jalgaon News : सोशल मीडियावर डिपफेकचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुद्ध त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्याचा मलाही अनुभव आला असून, मीही त्याचा बळी ठरलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना केले. (Deepfake will be used against BJP in elections: Chandrashekhar Bawankule)
चंद्रशेखर बावनकुळे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच मतदारांशी संवाद साधण्यात येत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुपर वॉरियर्सच्या बैठका त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याविरुद्ध मकाऊ येथील कॅसिनोमधील सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोचा उल्लेख केला नाही, पण सध्या सोशल मीडियावर होत असलेल्य डिपफेक प्रकाराचा उल्लेख करून ते म्हणाले की, येत्या निवडणुकीत सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाविरुद्ध मोठ्या प्रमाणात डिपफेकचा वापर होण्याची शक्यता आहे.
डिपफेक प्रकराचा मलाही अनुभव आला आहे. माझा संपूर्ण परिवार गायब करून त्या ठिकाणी माझा फोटो लावण्यात आला, त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच सुपर वारियर्सनी सोशल मीडियावर सतर्क राहावे आणि आपल्या नेत्याला बदनाम करणारी पोस्ट कुणी टाकली आहे काय? याची पाहणी करावी.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचेच सरकार येणार
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकालपूर्व येत असलेल्या ‘एक्झीट पोल’मध्ये कॉंग्रेसला यश दाखविण्यात येत आहे. पण, त्याचा उल्लेख न करता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आता महाविजयाकडे वाटचाल करीत आहे. केंद्रात 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर येणारच आहेत. तसेच, आता विधानसभा निवडणुका झालेल्या मध्य प्रदेशात व राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षच सत्तेवर येणार आहे, हे आपण खात्रीने सांगू शकतो. मध्य प्रदेशात सातव्यांदा भारतीय जनता पक्षाचेच सरकार सत्तेवर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.