Mohite Patil Vs Shinde : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोहिते पाटलांकडून निधीची पेरणी...

Madha Taluka News : रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभेच्या गावांमध्ये लक्ष घालून आगामी काळातील आपला मनसुबा या ठिकाणी स्पष्ट केला आहे.
Ranjitsinh Mohite Patil-Babanrao Shinde
Ranjitsinh Mohite Patil-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Madha News : अकलूजचे मोहिते पाटील आणि माढ्याचे शिंदे यांच्यातील राजकीय संबंध संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही दोन्ही गटांकडून एकमेकांना शह काटशह देण्याचे राजकारण खेळले गेले. पुढे मोहिते पाटील भाजपमध्ये गेले. मात्र, दोघांमधील राजकीय संघर्ष कायम राहिला आहे. आताही आमदार बबनराव शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून निधीची पेरणी सुरू आहे. (MLA Babanrao Shinde's Madha taluka was given funds by Ranjitsinh Mohite Patil)

माढा तालुक्यातील जाधववाडी, मोडनिंब, अरण, तुळशी, वैरागवाडी, परितेवाडी, सोलंकरवाडी ही गावे म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. विधानसभेच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गावे आहेत, परंतु याच गावांमध्ये आमदार शिंदे यांचे पारंपरिक विरोधक मोहिते पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitsinh Mohite Patil-Babanrao Shinde
Solapur News : दोन माजी सहकारमंत्र्यांसह सोलापुरातील मातब्बर नेत्यांच्या सात कारखान्यांना नोटीस...

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत नियोजन समितीतून माढा तालुक्यातील जाधववाडी, मोडनिंब, अरण, तुळशी, वैरागवाडी, परितेवाडी सोलंकरवाडी या गावांमध्ये नवीन ॲडिशनल ट्रान्सफार्मरच्या कामांसाठी 1 कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विधान परिषदेवर सदस्य म्हणून असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभेच्या गावांमध्ये लक्ष घालून आगामी काळातील आपला मनसुबा या ठिकाणी स्पष्ट केला आहे.

माढा तालुक्यातील या गावांत मोहिते पाटलांचा निधीच्या माध्यमातून होत असलेला शिरकाव हा आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये निधीच्या माध्यमातून, सामाजिक उपक्रम, सामाजिक कार्यांच्या माध्यमातून, भेटीगाठीच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी सातत्याने लोकसंपर्क ठेवण्यावर भर दिलेला आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Babanrao Shinde
Sunil Tatkare On NCP Crisis : राष्ट्रवादीमुळे 2014 ला भाजपचं सरकार, तटकरेंनी टाकला बॉम्ब; म्हणाले, 'साहेबांनीच...'

या लोकसंपर्कामुळे लोकसभा निवडणुकीला मोहिते पाटलांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही अधिक स्पष्ट होत आहे. लोकसभेच्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी करमाळा आणि माढा या दोन विधानसभा मतदारसंघांवर विषेश लक्ष केंद्रित केले आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Babanrao Shinde
Ajara Sugar Factory News: राज्यात नाही, पण कोल्हापुरात जमलं; भाजप-काँग्रेस-ठाकरे गटाची युती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com