Pooja Khedkar : दिल्ली पोलिस पूजा खेडकरांच्या मूळगावी; कोण कोणती कागदपत्र घेतली ताब्यात...

Investigation by Delhi Police in Ahmednagar in case filed against IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात UPSC ने दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी अहमदनगरमध्ये येत चौकशी केली.
IAS Pooja khedkar
IAS Pooja khedkarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पूजा खेडकर यांचा भारतीय प्रशासनातील प्रवेश गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. IAS ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पूजा खेडकर यांनी केलेल्या उद्योग आता संशोधनाचा विषय बनला आहे. UPSCने पूजा खेडकर यांच्याविषयी समोर आलेल्या बाबींनुसार दिल्लीत गुन्हा दाखल केला असून, त्याची तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासात दिल्ली पोलिस आता पूजा खेडकर यांचे अहमदनगरमधील मूळगाव भालगाव (ता.पाथर्डी) पर्यंत येऊन पोचले. पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबांशी निगडीत असलेली महत्त्वपूर्ण कागदपत्र दिल्ली पोलिसांनी पाथर्डी तहसील कार्यालयातून ताब्यात घेतली आहेत. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे पूजा खेडकर यांच्याभोवती अडचणी वाढणार असेच दिसते.

दिल्ली पोलिस (Police) पूजा खेडकर यांच्या मूळगावी भालगावमध्ये (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) दाखल झाले. दिल्लीत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी काही ठिकाणी तपास केला. पाथर्डी तहसील कार्यालयात जात तिथं महसूल प्रशासनाकडून पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांशी संबंधित असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. दिल्ली पोलिसांनी या छाननीत कोण-कोणती कागदपत्रे ताब्यात घेतली, याची गोपनीयता बाळगली. परंतु पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या आई तथा भालगाव (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीची लढवलेली निवडणूक आणि त्यासंदर्भातील कागदपत्र दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

IAS Pooja khedkar
Sharad Pawar : शरद पवारांच्या टायमिंगचे 'किस्से'; भाजपच्या 'सहकाराला' बसले हादरे

मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक देखील त्यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा तिथे पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भालगावच्या सरपंच पदाची निवडणूक लढवली. त्यावेळी त्या लोकनियुक्त सरपंच झाल्या. मात्र पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणूक दाखल केलेला अर्ज आणि त्यावेळी दाखल केलेले कागदपत्र दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

IAS Pooja khedkar
Pooja Khedkar: पूजा खेडकर यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही, कोर्टानं सांगितले कारण...

काय आहेत तक्रारी

पूजा खेडकर यांच्याविरोधात (UPSC) ने दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी UPSCने पूजा खेडकर यांना नोटीस बजावणून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. याचवेळी तुमची IAS पद रद्द का करू नये, असा देखील प्रश्न केला होता. आता दाखल गुन्ह्याचा तपास दिल्ली पोलिसांकडून वेगाने होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने देखील या प्रकरणी अहवाल देण्याचा आदेश केला आहे. पूजा खेडकर यांच्या संपत्तीची आयकर विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देखील चौकशी सुरू आहे. तसंच पूजा खेडकरविरोधात UPSC परीक्षा देताना नावात गेलेले बदल, दिव्यांग प्रमाणपत्र, संपत्तीचे विवरण, परीक्षा देण्यासाठी संधी वाढवून मिळण्यासाठी, असे अनेक प्रकार केले आहेत. याची गंभीर दखल UPSC घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com