Deolali Pravara Nagar Parishad Election Result : शिंदेंची डरकाळी हवेतच विरली; भाजपच्या चालीसमोर शिवसेना देवळाली प्रवरेत चारीमुंड्या चित झाली!

Deolali Pravara Municipal Election: BJP Wins 15 Seats, Satyajeet Kadam Elected Mayor : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.
Deolali Pravara Nagar Parishad Election Result
Deolali Pravara Nagar Parishad Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Deolali Pravara Nagar Parishad 2025 Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात येत, एकनाथ शिंदे यांनी डरकाळी फोडली होती. पण ही डरकाळी हवेतच विरली. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली.

नगरपालिकेच्या 21 जागांपैकी भाजपने नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपचे सत्यजित कदम 5 हजार 500 मतांनी निवडून आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली.

देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत रंगत भरली होती. पण मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवला. नगराध्यक्षपदासह भाजपने 15 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसने लढवलेल्या 21 जागांपैकी चार उमेदवार विजयी झाले. तर एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी एक जागावर विजय मिळवला.

देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक न्यायालयात गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने 20 डिसेंबरला मतदान झाले. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे, आज मतमोजणी झाली. भाजपचे (BJP) माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदासाठी त्यांचे पुत्र सत्यजित कदम, काँग्रेसकडून कृष्णा मुसमाडे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बाबासाहेब मुसमाडे, यांच्यात तिरंगी लढत झाली.

Deolali Pravara Nagar Parishad Election Result
Newasa Nagar Panchayat Result : नेवाशात एकनाथ शिंदेंचा 'कॅप्टन', तर गडाखांचे शिलेदार करणार 'बॅटिंग'

तसेच 21 नगरसेवक पदासाठी या तीनही पॅनलचे उमेदवार उभे होते. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी 5500 मतापेक्षाही जास्त फरक ठेवत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. भाजपचे सत्यजित कदम यांना 10424 मतदान पडले, तर काँग्रेसचे कृष्णा मुसमाडे यांना 4724 मतदान पडले. तसेच शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे यांना 2897 मतदान पडले.

Deolali Pravara Nagar Parishad Election Result
Shrigonda Nagar Parishad Election Result : आमदार पाचपुतेंनी उधळलाय दुसऱ्यांदा गुलाल, पण चर्चा अजितदादाच्या शिलेदाराची!

वंचितने पहिल्यादांच खातं खोललं

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. वंचित बहुजन आघाडीचे पहिल्यादांच खाते नगरपालिकेत उघडले आहे. वंचितने देखील सर्व 21 जागांवर उमेदवार दिले होते. तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या पत्नी सुनीता थोरात यांनी देखील या नगरपालिकेत दुसरा विजय मिळवला. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने लढवलेल्या सर्व 21 जागांपैकी फक्त आशा चव्हाण, या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत.

शिंदेंसमोर संयमी ठरले कदम

भाजपचे सत्यजीत कदम यांनी निवडणुकीत अतिशय संयमाची भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोड मिळाली. प्रचार सभेबरोबर, प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. तुलनेत विरोधकांच्या प्रचारात विसंगती होती. एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या उमेदवारांची प्रचार सभा घेत, वातावरण निर्मितीसाठी भाजपच्या बालेकिल्ल्यात घोषणांचा पाऊस पाडला. परंतु मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com