Devendra fadnavis Politics: नागपूर जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्री पुढे आले, दत्तक नाशिकच्या जिल्हा बँकेसाठी धावणार काय?

Devendra fadnavis; CM Fadnavis shall also help Nashik NDCC Bank- नाशिक जिल्हा बँकेने राज्य शासनाकडे मदतीसाठी सादर केलेला प्रस्तावाकडे दुर्लक्ष
Devendra Fadanvis & Ajit Pawar
Devendra Fadanvis & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra fadnavis News: राज्यातील विविध जिल्हा बँकांच्या अडचणी वाढत आहेत. थकबाकी आणि वाढता एनपीए हा त्याचा मुख्य प्रश्न आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीसाठी धावून आले. सुमारे अकराशे कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या नागपूर बँकेला फडणवीस यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे ही बँक आता अडचणीतून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकेल अशी चर्चा आहे.

Devendra Fadanvis & Ajit Pawar
Kirit Somaiya Politics: नागपूर दंगलीमागचा मास्टर माईंड फहीम खान याचे असेही मालेगाव कनेक्शन...

नागपूर जिल्हा बँकेचे पालकत्व आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या वतीने नागपूर जिल्हा बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. या निमित्ताने राज्य सहकारी बँक या बँकेला आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ देण्यास सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा यामध्ये महत्त्वाचा सहभागआहे.

Devendra Fadanvis & Ajit Pawar
NCP Ajit Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येमागे अंमली पदार्थांची विक्री?

राज्यातील काही जिल्हा बँका अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बँकही थकबाकी आणि अनुत्पादक कर्जांमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपये अर्थसहाय्य शासनाने करावे, असा प्रस्ताव यापूर्वी सादर करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नाशिक जिल्हा बँकेबाबत बैठक झाली होती. यावेळी जिल्ह्यातील माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि दादा भुसे या तिन्ही मंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्यावर काहीही कारवाई होऊ शकलेली नाही

नाशिक जिल्हा बँकेकडे दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय सुमारे एक हजार १०० कोटी रुपयांचा एनपीए आहे. ६५० कोटींची मदत अपेक्षित आहे. आर्थिक अडचणींमुळे या बँकेचे लायसन्स रद्द होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन वर्षांपूर्वी असा प्रस्ताव शासनाला दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलताना जिल्हा बँकेला मदत करण्याची घोषणा देखील केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील बँकेच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी नाशिकला दत्तक घेतले आहे. त्यामुळे नागपूरच्या बँकेला मदत केली तशीच दत्तक नाशिकच्या जिल्हा बँकेला मदत करणार की नाही, अशी विचारणा होत आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com