NCP Ajit Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येमागे अंमली पदार्थांची विक्री?

Police Investigation on NCP Leader’s Murder: भांग आणि गांजा विक्रीच्या अवैध व्यवसायातून झालेल्या वादाने हत्या झाल्याचा तक्रारदारांचा दावा.
Manna Jadhav & Prashant Jadhav
Manna Jadhav & Prashant JadhavSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव यांची भावासह हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयतांना अटक केली आहे. आता पोलीस हत्येचे कारण शोधण्यात व्यस्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. गुन्हेगारांनी सशस्त्र हल्ला केल्याने या दोघा बंधूंचा मृत्यू झाला होता. त्याचा तपास पोलिसांनी यशस्वीपणे केला आहे.

Manna Jadhav & Prashant Jadhav
Puja Khedkar Latest Controversy : पूजा खेडकर 'हाजीर हो', आता हे नवे प्रकरण निघाले...

या संदर्भात पोलिसांनी हत्येचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादातून हा प्रकार झाला आहे. त्यात भांग आणि गांजा विक्रीचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला होता. पोलिसांना त्याची टीप जाधव यांनी दिल्याचा संशय होता. हे तात्कालीक कारण ठरले आहे.

Manna Jadhav & Prashant Jadhav
Nashik Crime: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची हत्या गुन्हेगारीच्या वर्चस्वातून... खंडणीचाही अँगल!

यासंदर्भात पोलिसांनी सचिन रेडेकर, अनिल रेडेकर, सागर गरड, योगेश रोकडे, अविनाश उर्फ सोनू उशिरे या पाच जणांना अटक केली आहे. यातील सागर गरड याच्या विरोधात गांजा विक्रीचा गुन्हा दाखल आहे. बजरंगवाडी परिसरात त्यांचा अवैध व्यवसाय होता, असे पोलिसांनी सांगितले.

या व्यवसायातून वर्चस्ववादाचा संघर्ष निर्माण झाला. मयत उमेश जाधव याने पोलिसांना संशयीतांच्या भांग आणि गांजा विक्रीच्या अड्ड्याची टीप दिली होती. संशयतांना त्याचा राग होता. यातूनच ही आत्या झाल्याचा दावा मयत जाधव बंधूंचे मामा विनोद पवार यांनी केला आहे.

नाशिक शहरात गेली काही दिवस खुनांचे सत्र सुरू आहे. शहराच्या विविध भागात महिन्याभरात सहा हून अधिक हत्या झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे. पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेत वेगाने तपास करून पाच जणांना अटक केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com