Kirit Somaiya Politics: नागपूर दंगलीमागचा मास्टर माईंड फहीम खान याचे असेही मालेगाव कनेक्शन...

Nagpur Riots Mastermind Faheem Khan: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फहीम खान याच्या चौकशीसाठी नागपूरच्या सहाय्यक पोलिस महासंचालकांकडे केली मागणी
Police Investigation on Nagpur Riots
Police Investigation on Nagpur RiotsSarkarnama
Published on
Updated on

Fahim Khan News: नागपूर दंगल प्रकरणाची मुख्य संशयित फहीम खान याच्या चौकशीची मागणी होत आहे. फहीम खान याच्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने मालेगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मालेगावच्या चौकशीसाठी पुन्हा एकदा एक नवा मुद्दा मिळाला आहे. यासंदर्भात त्यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणातील संशयित फहीम खान याच्या चौकशीची मागणी केली आहे. नागपूरचे विशेष पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांच्याकडे त्यांनी पत्र दिले आहे.

Police Investigation on Nagpur Riots
NCP Ajit Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येमागे अंमली पदार्थांची विक्री?

नागपूर प्रकरणात अटक झालेल्या फहीम खान याने हिंसाचाराला चिथावणी दिली होती. फहीम खानच्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीने मालेगाव मध्य मतदारसंघात विधानसभेसाठी फरहान शकील अहमद यांना उमेदवारी दिली होती. यानिमित्ताने तो मालेगावला देखील आला होता.

Police Investigation on Nagpur Riots
Puja Khedkar Latest Controversy : पूजा खेडकर 'हाजीर हो', आता हे नवे प्रकरण निघाले...

औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. नागपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि अन्य संस्थांनी आंदोलन केले होते. त्यातून दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. सध्या राज्यभर हा विषय चर्चेचा आणि चिंतेचा बनला आहे.

मालेगाव शहरात जन्मदाखले आणि त्यासाठी बनावट कागदपत्रांचा झालेला वापर टीकेचा विषय आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. मध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते.

या प्रकरणात बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा त्यांनी केला होता. अनुषंगाने फहीम खान निवडणुकीदरम्यान मालेगावला येऊन गेला होता. त्यामुळे त्याचे मालेगाव कनेक्शन तपासले जावे. यामध्ये नक्कीच गंभीर विषय पुढे येतील विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम नागरिक यावर सोमय्या यांचा कटाक्ष आहे.

पोलिसांनीही या संदर्भात यापूर्वीच सक्रिय होत फहीम खानशी संबंधित चौकशी केली आहे. फाईम खान याच्या पक्षाने फरहान शकील अहमद याला उमेदवारी दिली होती. फरहान अहमद यांनी आपल्या फहीम शेख यांच्याशी निवडणुकीपूर्वी एबी फॉर्म देण्यासाठी भेट झाली होती. या पलीकडे आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही. लहान मुलांचे कपडे आणि बुरखे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फरान अहमद याने फहिमबाबत आपले हात झटकले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com