Girish Mahajan : गिरीश महाजनांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी सोपवली पुन्हा महत्वाची जबाबदारी!

Portfolio Allotment : जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना पुन्हा एका राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने जळगावचा राजकीय दबदबा वाढला आहे
Girish Mahajan-Devendra Fadnavis
Girish Mahajan-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 22 December : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून गिरीश महाजन परिचित आहेत. त्यांना भाजपचे संकटमोचक असेही संबोधले जाते. फडणवीसांना आता महाजन यांच्यावर त्यांना साजेशी अशी जबाबदारी आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील या तिघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे जळगावला पुन्हा तीन मंत्री मिळाले आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणात जळगावचा दबदबा वाढणार आहे.

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना फडणवीस आणि भाजपचे 'संकट मोचक' असेही संबोधले जाते. पक्षाचे संकट मोचक असलेले महाजन यांना आता जलसंधारण खात्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन हा विभागही देण्यात आला आहे. त्यामुळे महाजन आता राज्याचे "संकट मोचक"झाले असे म्हटल्यास वावगे नाही. त्यामुळे जळगावच्या राजकारणात महाजन यांच्या या विभागाची विशेष चर्चा होत आहे.

गिरीश महाजन यांच्याकडे यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री ही जबाबदारीही होती. यंदा मात्र राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करताना येत्या दोन वर्षांनी नाशिकला (Nashik) होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्री अद्याप घोषित केलेला नाही. येत्या काही दिवसात तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिकला होत असल्याने नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाची पावले त्या दिशेने पडताना दिसत आहेत.

Girish Mahajan-Devendra Fadnavis
Rahul Gandhi Markadwadi Tour : ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार; राहुल अन्‌ प्रियांका गांधी 10 जानेवारीला मारकडवाडीत येणार

नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहे. मात्र, गेल्या सरकारप्रमाणेच यंदाही भाजपला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे, सध्याच्या मंत्रिमंडळात नाशिकला भाजपच्या आमदारांना मंत्री म्हणून स्थान मिळालेले नाही. प्रत्यक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आमदार राहुल आहेर यांना मंत्री करू, असे जाहीर विधान केले होते, त्यामुळे नाशिकमधून भाजपला मंत्री मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षाची आणि आमदारांची याबाबत निराशा झाली आहे

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, यातील गिरीश महाजन यांना नाशिकची जबाबदारी दिल्यास जळगावचे पालक कोण याविषयी चर्चा सुरू आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चांगलीच चुरस आहे हे दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये आणि विशेषतः नेत्यांमध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावरून चांगलीच रस्सीखेच होऊ शकते.

Girish Mahajan-Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल, CM फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर कारवाईला वेग

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद मिळाल्यास जळगावच्या राजकारणावर शिवसेना शिंदे पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी मंत्री पाटील त्याचा उपयोग करू शकतील, त्यामुळे भारतीय जनता पक्षात अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे जळगावचे पालकमंत्री भाजप की शिवसेना शिंदे हा सध्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com