Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल, CM फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर कारवाईला वेग

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. या हत्या प्रकरणावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.
Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Devendra Fadnavis, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. या हत्या प्रकरणावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

विरोकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा समावेश आहे, त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

अशातच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाबाबत राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानुसार काल अविनाश बारगळ (Avinash Bargal) उचलबांगडी करत त्यांच्या जागी नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांची नियक्त करण्यात आली होती.

Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Dhananjay Munde : 'मंत्रिमंडळात सहभागी करु नका', प्रचंड विरोधानंतरही खातं मिळताच धनंजय मुंडेंनी केलेली पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

अशातच आता या हत्या तपासासाठी सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे मराठा समाजासह विरोधक आक्रमक झाले आहेत.

वाल्मिक कराडमुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ

याच पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अजित पवारांना एक निवेदन देण्यात येणार आहे. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंना अटक करत त्यांची त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.

Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Chhatrapati Sambhajinagar : खातेवाटप जाहीर होताच मंत्रि‍पदी वर्णी लागलेला शिंदेंचा 'हा' नेता म्हणतो पालकमंत्रीही मीच होणार...

तर याच वाल्किम कराड (Valkim Karad) याच्याशी धनंजय मुंडेंचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये, त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू नये, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असतानाही मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिल्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com