
Devendra Fadnavis meet attend Marriage at Kopardi : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवीयन मुलीवर २०१६मध्ये बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली गेली होती. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता, शिवाय सर्वचस्तरातून प्रचंड संतापही व्यक्त झाला होता. त्यानंतर या घटनेतील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता या घटनेला आठ वर्षे उलटून गेली असून आज त्या कुटुंबातील मुलीचं लग्न होतं आणि विशेष म्हणजे या विवाहसमारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: हजर होते.
याचे कारण, फडणवीसांनी(Devendra Fadnavis) त्या कुटुंबाला त्या घटनेनंतर शब्द दिला होता की, मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे आणि तुमच्या मुलीच्या लग्नासही उपस्थित राहील. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला शब्द पाळला. ज्याबाबत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एका पोस्टद्वारे माहिती दिली.
आमदार चित्रा वाघ(Chitra wagh) म्हणतात, 'आज पुन्हा एकदा प्रचिती आली भाऊ असावा तर आमच्या देवा भाऊंसारखा. आठ वर्षांपूर्वी कोपर्डीमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र तेव्हा आमच्या देवा भाऊंनी कोपर्डीतल्या पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला होता.'
'त्यांना सांगितलं होतं की ते कायम पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. त्यावेळी पीडीतेच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नाविषयी काळजी व्यक्त केली होती आणि देवा भाऊंनी कुटुंबीयांना सांगितलं होतं की, तिच्या लग्नाची जबाबदारी मीच घेईल आणि इतकच नाही तर तिच्या लग्नाला देखील आवर्जून उपस्थित राहील.'
'आणि आज तो दिवस उगवला. देवा भाऊंनी दिलेला शब्द पाळला लग्नाला उपस्थित राहीले आणि लग्नात मंगलाष्टक ही आमच्या प्रविणभाऊंनी गायली लग्नाला देवाभाऊ प्रविणभाऊ सोबतच आमदार राम शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनी वधू-वराला भरभरून आशीर्वाद दिले…आमच्याकडूनही उभयतांना खुप साऱ्या मंगलमय शुभेच्छा…!'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.