Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री होणार, संजय राऊत यांचा मोठा दावा; त्या मागचं कारणही सांगितलं...

Sanjay Raut On Devendra Fadnavis धर्मेंद्र प्रधानांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावणं आलं आहे.
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) च्या रेट्यापुढे अखेर मोदी सरकार झुकले आहे. धर्मेंद्र प्रधानांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर आता देशात घडामोडींना वेग आला आहे.

महाराष्ट्रातही मोठ्या घडामोडींना वेग आला असून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना इतक्या तातडीने दिल्लीत का बोलावून घेतले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, असे असताना ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून त्यांना केंद्रात शिक्षण मंत्रिपद मिळू शकतं असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत. तसेच शिक्षित आहेत. अनेक विषय ते मांडत असतात. मला ते शिक्षणमंत्री होण्याची शक्यता अधिक वाटते असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Dharmendra Pradhan resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र तुफान व्हायरल ; पत्रात नेमकं काय लिहिलंय?

न झुकण्याची भाषा पीएम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांकडून होत होती. आंदोलक विद्यार्थ्यांना परदेशी एजंट व अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनाला परदेशातून पैसे येताय, अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या गेल्या. हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशाप्रकारची मस्ती सरकारमध्ये होती. बारा वर्षातील हे एक असे आंदोलन झाले , ज्यात पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागल्याचे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Dharmendra Pradhan Resigns : मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांचा मोठा विजय!

मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात मोठे भाष्य केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील वर्णीबाबत विचारताच, त्या म्हणाल्या, 'नाही… नाही… मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार..' अर्थात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच हे सूचक विधान अमृता फडणवीस यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्या या विधानानंतर अवघ्या आठ तासांत फडणवीस दिल्लीला गेल्याने या विधानाची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com