Shivsena UBT Politics: शिवसेना आक्रमक, फडणवीसांचा पुतळा जाळला, राजीनाम्याची मागणी

Shivsena Burnt Statue of Devendra Fadnavis Demanding Resignation : गृहमंत्रीपदी राहण्याची नैतिकता देवेंद्र फडणवीस यांनी गमावली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद चाळीसगाव आणि पाचोरा येथे उमटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राज्य सरकार विरुद्ध आंदोलन झाले. यावेळी राज्य शासनाविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.

पाचोरा येथे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

बदलापूर येथील घटना लज्जास्पद आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे तक्रार घेऊन गेलेल्या गर्भवती महिलेला पोलिसांनी दहा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. तिची तक्रार न घेता तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा हा प्रकार आहे.

सबंध पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी आरोपी आणि संबंधित शिक्षण संस्थेला वाचविण्यासाठी सांगण्यावरून हे सर्व करण्यासाठी धडपडत होते. ते कोणत्या सत्ताधारी राजकीय नेत्याच्या सागंण्यावरून हे करीत असावेत, वेगळे सांगण्याची गरज नाही.

Devendra Fadanvis
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची फटकेबाजी, म्हणाले, "बदलापूरचा जनरल डायर कोण"

या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदी राहण्याचा अधिकार गमावला आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्यभरातील जनता आणि विशेषतः महिला महायुती सरकार विरोधात संतप्त आहेत.

आम्हाला आता लाडकी बहीण योजना नको आहे. आम्हाला लाडक्या बहिणीला सुरक्षित बहिण करायचे आहे. या सरकारने तो अधिकार देखील गमावला आहे, अशी तीव्र नाराजी श्रीमती सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

यावेळी चाळीसगाव येथील उमंग महिला समाजसेवी परिवाराच्या संपदा पाटील यांनी राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनांमुळे महिला भयभीत झाल्या आहेत. राज्य शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी. लाडकी बहीण सुरक्षित बहीण कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. कायदा आणि सुव्यवस्था अधिक कठोर करण्यासाठी सरकारने पावले टाकावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Devendra Fadanvis
Maha Vikas Aghadi : मतदार याद्यांमध्ये छुप्या मतपेरणीचा घोटाळा; 'मविआ'ची पुराव्यांसह तक्रारीवर प्रशासन काय करणार

यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यापूर्वी महिलांनी जोरदार निदर्शने करीत घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या दोन लहान मुलींच्या हस्ते फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला अग्नी देत दहन करण्यात आले.

पाचोरा येथे श्रीमती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, संदीप जैन, अभिषेक खंडेलवाल, शरद पाटील, अॅड अभय पाटील, संजय चौधरी, जे.के. पाटील यांसह विविध नेते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com