Raj Thackeray : प्रत्युत्तर काय येणार? राज ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांच्या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष, वेळ-तारीख दोन्ही ठरले'.

Devendra Fadnavis Raj Thackeray : नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच निशाण्यावर घेतलं. फडणवीस यांच्यासह भाजपवर त्यांनी जहरी टीका केली.
Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. ९) संयुक्त प्रचार सभा झाली. दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या ठाकरे शैलीत भाजपसह शिवसेना शिंदे गटावर टीकास्र सोडलं. विशेषकरुन राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. आता उद्याच्या (दि.११) होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज यांनी केलेल्या टिकला काय व कसे उत्तर देतात ते पाहावे लागणार आहे.

दरम्यान आज (दि.१०) एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. तेही ठाकरे बंधूंना काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेले असतानाच फडणवीस यांचीही त्यानंतर लगेचच म्हणजे ११ तारखेला सभा होणार आहे. नाशिकच्या गोदाघाटावर सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे.

राज ठाकरेंनी नाशिकमध्ये झालेल्या आपल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांना विशेष टार्गेट केलं. २०१७ मध्ये फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. मात्र हा बाप परत नाशिकमध्ये फिरकलाच नाही अशी खोचक टीका राज ठाकरेंनी फडणवीसांवर केली.

Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
Raj Thackeray Nashik speech : राज ठाकरेंनी अचूक नेम धरला, रामभूमीतून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांवर एकाचवेळी बाण सोडले..

नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी क्रीडाप्रबोधिनी...असे अनेक प्रकल्प फडणवीस यांनी जाहीर केले. फडणवीस यांनी नाशिककरांना आश्वासन दिलेल्या प्रकल्पांची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली. दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन फडणवीसांनी पूर्ण केले नाही असे राज ठाकरे म्हणाले. नाशिककरांना दिलेल्या या आश्वासनांचे काय झाले, किती प्रकल्प पूर्ण केले असा प्रश्न उपस्थित केला.

१९५२ साली जनसंघ नावाने जन्माला आलेल्या भाजपला २०२६ मध्ये दुसऱ्यांची पोरं भाड्याने घ्यावी लागत असल्याची जहरी टीका राज ठाकरेंनी केली. फडणवीसांनी २०२७ मध्ये नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेला नाशिककर भुलले आणि मनसेची सत्ता गेली व भाजपची सत्ता आली. अशी खंत व्यक्त करत त्यांनी भाजप-फडणवीसांना डिवचलं. त्यामुळे राज ठाकरेंना आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
Uddhav Thackeray Nashik : देवयानी फरांदे रडल्या, त्यांना रडू आवरेना.. उद्धव ठाकरेंनी जागवल्या कटू आठवणी

दरम्यान फडणवीस हे आपल्या भाषणात राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतात. मुंबई बाहेरील व्यक्ती संबोधल्याने त्यावरही उत्तर देऊ शकतात. तपोवनातील वृक्षतोडीला उघडपणे समर्थन न करता बचावात्मक भूमिका घेत प्रशासनाने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे समजून सांगू शकतात. नाशिककरांना मतदान करण्यासाठी साद घालणार..तसेच कुंभमेळ्यासंदर्भातही काही नवीन घोषणा शक्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com