Devendra Fadnavis : 'भाजपचा DNA विचारायची हिम्मत करु नका', मंत्री कोकाटेंना फडणवीसांनी सिन्ररमध्ये जाऊन खडसावलं..

Devendra Fadnavis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांनी एका प्रचारसभेत भाजपवर जोरदार टीका केली होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच कोकाटेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
Devendra Fadnavis Manikrao Kokate
Devendra Fadnavis Manikrao Kokatesarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : सिन्नर नगरपालिका निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याविरुध्द लढावे लागत आहे. भाजपने कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांना व शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांना गळाला लावलं असल्याने कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी सिन्नर येथील प्रचारसभेत भाजपवर सडकून टीका केली होती.

कोकाटे म्हणाले प्रचारासाठी मी महाराष्ट्रात फिरत असताना मला हे जाणवलं की सर्व लढाया आपसाआपसामध्ये म्हणजे युतीमध्येच जास्त सुरु आहेत. जास्त संघर्ष युतीतच आहे. आपल्याकडे थोडासा उबाठा आहे. पण बीजेपी पूर्ण बाटलेली आहे. इकडून फोड, तिकडून फोड भाजपचे आख्खे आयुष्य फोडाफोडीत गेलं आहे. भाजप हा बाटलेला पक्ष आहे अशी टीका कोकाटे यांनी केली होती.

त्यानंतर काल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत फडणवीस यांना कोकाटे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला व नाव न घेता त्यांना खडेबोल सुनावले.

Devendra Fadnavis Manikrao Kokate
Ajit Pawar Politics: बापरे!, अजित दादा हे काय बोलले?, स्वतःच्याच आमदारांची झोप उडवली!

सभेच्या सुरवातीला सिन्नरचे नेते उदय सांगळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत 'भाजप बाटलेला पक्ष असून त्याचा डीएनए तपासावा लागेल,' असे ते म्हणाल्याचे सांगितले. तोच धागा पकडत फडणवीस यांनी कोकाटेंना जोरदार उत्तर दिलं.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'मला कोणावरही टीका करायला आवडत नाही. ज्यांच्याकडे विचार नाही, दिशा नाही, तेच टीका करतात. माझ्याकडे दिशा आहे, विकासाची कामे आहेत आणि त्यावर आम्ही मतदारांसमोर जातो. परंतु भाजपचा डीएनए विचारण्याची हिंमत कोणी करू नये.

आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजिते दात जात ही आमुचि, पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची असं फडणवीसांनी सुनावलं.

Devendra Fadnavis Manikrao Kokate
Manikrao Kokate : भाजपने घर फोडलं…अखेर मंत्री कोकाटेंना संताप अनावर, बाटलेला पक्ष अन् काय काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक मंत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासूनच भाजपवर टीका सुरू होती. काही ठिकाणी भाजप व शिवसेनेत युतीवरुन फिस्कटल्यानेही नेत्यांमध्ये अंतर वाढले. क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनीही तशीच भूमिका घेत भाजपवर सडकून टिका केली. कोकाटेंनी भाजपच्या 'डीएनए'वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले असताना फडणवीसांनी सिन्ररमध्ये येऊनच कोकाटेंना उत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com