Ajit Pawar: शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकले?

अजित पवार यांनी सध्या राज्यात खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु असल्याची टिका केली.
Ajit Pawar & CM Eknath Shinde
Ajit Pawar & CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) कुणासमोरही झुकले नाहीत, त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे; परंतु राज्यातील (Maharashtra) शिंदे सरकार (Eknath Shinde) कुणाच्या तरी दबावाखाली झुकून निर्णय घेत आहे. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. (Opposition leader Ajit Pawar Questined On Eknath Shinde)

Ajit Pawar & CM Eknath Shinde
Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा झाला. या वेळी ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की राज्यातील दोन लाख कोटी गुंतवणुकीचा ‘वेदांत फॉक्सकॉन’ हा प्रकल्प महाराष्ट्राने सर्व सवलती दिल्या असतानाही तो गुजरातमध्ये कसा गेला, याचे उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यातील शिंदे सरकार कुणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. दबावाखाली झुकून तडजोडीने निर्णय घेतले जात असतील तर महाराष्ट्राचे हित हे सरकार कसे जोपासणार, हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.

Ajit Pawar & CM Eknath Shinde
Medha Patkar : मी गुजरातची भावी मुख्यमंत्री नाही, तो केवळ अपप्रचार!

राज्यात अस्वस्थ वातावरण

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, की राज्यात पक्षांतराचे कायदे मोडीत काढून हे सरकार सत्तेवर आले आहे, मात्र अद्यापही त्यांचे कामकाज व्यवस्थित नसल्यामुळे राज्यात आजही अस्वस्थ वातावरण आहे. अद्यापही राज्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे मंत्रालयात फायली अद्यापही पडून आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडेल, याची केवळ घोषणाच केली जात आहे. महागाईच्या मुद्द्याकडे तर हे सरकार लक्षच देत नाही. जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करून दुसराच मुद्दा काढला जात आहे.

कायदा व सुव्यवस्था धुळीस

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा व सुव्यवस्था मोडत असल्याचे दिसत आहे. कुणी आमदार पिस्तुलातून गोळ्या झाडतो, तर कुणी आमदार हातपाय तोडण्याची धमकी देत आहे. काय चाललंय, हेच कळत नाही. या प्रकारामुळे मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी होत आहे. राज्यात अशा प्रकारचे राजकारण कधीच झाले नाही.

या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com