'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' असे म्हणतात. त्याचा प्रत्यय धुळ्यातील पोलिस उपनिरीक्षक आरिफ सय्यद यांच्याबाबत आला. या अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे याच अधिकाऱ्याला जुलै 2010 मध्ये लाच घेताना अटक केली झाली होती आणि त्यासाठी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. थोडक्यात लाच घेण्याची सवय लागली की, त्याचा मोह सुटत नाही, याचा हा धक्कादायक अनुभव आहे.
धुळे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आरिफ सय्यद (Arif Sayyad) या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला गुरुवारी 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक (Crime) करण्यात आली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाचखोरांविरुद्ध सापळा रचण्याची कारवाई सामान्य असते. आता ती सगळ्यांच्याच अंगवळणी पडली आहे. मात्र या प्रकरणात आरोपी असलेले पोलीस उपनिरीक्षक यांनाच लाच घेणे अंगवळणी पडले असल्याचे धक्कादायक चित्र यातून दिसले.
तक्रारदाराने एसीबीचे अधिकारी अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या चुलत भावाचे 2021 मध्ये निधन झाले होते. निधनानंतर त्यांची दोन कोटींच्या विमा पॉलिसीची रक्कम एजंटने परस्पर दुसऱ्या खात्यात जमा केली होती. त्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. (Anti Corruption)
कोर्टाने याबाबतचा सकारात्मक अहवाल देण्याच्या सूचना होत्या. त्याचा तपास उपनिरीक्षक अरिफ अली सय्यद यांच्याकडे असल्याने तक्रारदाराने त्यांच्याशी संपर्क केला. मात्र सय्यद यांनी तसा अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार खातरजमा करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
एसीबीच्या पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम रामदास बरेला प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर या अधिकाऱ्यांनी हा सापळा रचून सय्यदला 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. या प्रकरणाचा तपास करताना आणखी रंजक माहिती पुढे आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिस उपनिरीक्षक सय्यद सोनगीर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. यावेळी 22 जुलै 2010 रोजी त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणात सेशन्स कोर्टाने 2013 मध्ये त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. या विरोधात सय्यद यांनी हायकोर्टात धाव घेतली. 2019 मध्ये हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक सय्यद धुळे पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. पण त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. तर दुसऱ्यांदा लाचखोरीच्या जाळ्यात सापडले. (Latest Marathi News)
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.