Raigad News : रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाली असताना महायुतीकडून अद्याप विद्यमान खासदार सुनील तटकरे की भाजपचे धैर्यशील पाटील अशी चर्चा सुरू आहे. मात्र, अनंत गीते यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान दिला आहे. हिंमत असेल तर सुनील तटकरे यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, मग त्यांची काय अवस्था होईल ते बघा, असं आव्हान गीते यांनी तटकरे यांना दिले आहे.
महाविकास आघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे (Raigad Lok Sabha Constituency) उमेदवार माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) म्हणाले, भाजपच्या सर्व्हेमध्येच सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा तब्बल एक लाख वीस हजार मतांनी पराभव होईल, असा अहवाल आला आहे. त्यामुळे भाजपवाले म्हणतात की, मग तटकरे यांना उमेदवारी कशाला द्यायची. पण, भाजपचा (BJP) उमेदवार दिल्यास आमचा पराभव 80 हजारांनी होईल, असेही ते सांगतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रायगडची जनता निवडणुकीची वाट आतुरतेने पाहते आहे. रायगडच्या जनतेला या विश्वासघातक्यांचा सूड उगवायचा आहे. तटकरे यांनी त्यांच्या राजकीय जन्मापासून कोणा कोणासोबत विश्वासघात नाही केला, असा सवाल गीते यांनी केला. तटकरे यांना पहिला राजकीय जन्म दिला, त्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा त्यांनी विश्वासघात केला, ज्यांचं राजकारण संपत आलं होतं. रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती. त्या हद्दपारीतून शेकापने वाचवलं, त्या जयंत पाटलांचा त्यांनी विश्वासघात केला
ज्या शरद पवार यांनी त्यांना राजकीय नेते केलं, त्यांच्या कुटुंबाला घराण्याला त्यांनी राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवार यांचाही त्यांनी विश्वासघात केला, अशी जहरी टीका अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.
अशा या विश्वासघातक्याला रायगडची जनता धडा शिकवण्याची वाट पाहते आहे. कारण हा रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या या रायगडाने बेईमानी, फितुरी, गद्दारी त्यावेळीही खपवून घेतली नाही आणि आतासुद्धा ही गद्दारी रायगडची जनता खपवून घेणार नाही, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गीते यांनी दिला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.