Amrishbhai Patel Politics: अमरीशभाई पटेल यांचा गर्भित इशारा; भाजप पराभूत झाल्यास धुळे शहराची पिछेहाट?

Dhule BJP Amrishbhai Patel warns citizens about city development during municipal election campaign -धुळे शहराचा विकास हवा तर येत्या महापालिका निवडणुकीत धुळेकरांना भाजपला मतदान करावेच लागेल!
Amrishbhai Patel
Amrishbhai PatelSarkarnama
Published on
Updated on

Dhule Municipal Corporation News: धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरला आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.

धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता आमदार अमरीशभाई पटेल यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी धुळे शहरातील विकास कामांची यादीच मांडली.

गेल्या पाच वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे शहराच्या विकासासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागले. भविष्यात शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम होणार असल्याचे आमदार पटेल म्हणाले.

Amrishbhai Patel
Girish Mahajan: गिरीश महाजन यांची नवी घोषणा! 'या' शहरात उभारणार अयोध्येसारखे श्रीराम मंदिर

या निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे. भाजपला विकासाची कामे करण्यासाठी संधी द्यावी. झोपला या निवडणुकीत संधी न मिळाल्यास धुळे शहराची विकासात पीछेहाट होईल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

Amrishbhai Patel
Nashik Politics : राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांची माघार! अजितदादांच्या सामंजस्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या उमेदवारांना मोठा दिलासा

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराचा कायापालट होऊन नागरिकांचे अनेक प्रश्न सुटतील, असे आमदार पटेल म्हणाले.

गेल्या पाच वर्षात जनतेने भाजपवर विश्वास टाकून सत्ता दिली. शहराचा प्रदीर्घ काळ रेंगाळलेला पाण्याचा प्रश्न भाजपने सोडवला. अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे. काळात दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ होईल. रस्त्यांसह अनेक कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

आमदार अनुप अग्रवाल यांनी आमदार म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून दीडशे कोटींची कामे केली आहेत. राज्यातील सरकार धुळे शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठिंबा देत आले आहे. आगामी निवडणुकीतही भाजप स्वबळावर धुळे महापालिकेत सत्तेत येईल असा दावा त्यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com