Nashik Politics : राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांची माघार! अजितदादांच्या सामंजस्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या उमेदवारांना मोठा दिलासा

Nashik municipal election 2026 : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल पत्रक काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांची माघारीची घोषणा केली. वंदना महाले (१अ), विजय अहिरे (११अ), जीवन रायते (११ड) आणि शेखर देवरे (१३क) या उमेदवारांची निवडणुकीतील माघार घेण्यात आली आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar-led NCP leaders and Shinde Sena representatives during discussions ahead of the Nashik municipal election, highlighting alliance coordination.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 13 Jan : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काल नाशिक महापालिका निवडणुकीत सामंजस्य दाखवल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील वादाला सुखद धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंटी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची युती आहे.

या युतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप स्वबळावर उमेदवारी करीत असल्याने राजकीय सोयीतून ही युती झाली. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मचे वाटप केले. त्यात काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत.

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षाने उर्मिला निरगुडे (प्रभाग १अ), योगेश गांगुर्डे (११अ), धीरज शेळके (११ड), दीपक डोके (१३ क) या चार जणांना उमेदवारी दिली होती. याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या युतीचे अधिकृत उमेदवार कोण? हा गोंधळ होता.

Ajit Pawar, Eknath Shinde
Election Commission : महापालिकेत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा! 'कायद्यातच 'बिनविरोध'ची तरतूद असल्याचं निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल पत्रक काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांची माघारीची घोषणा केली. वंदना महाले (१अ), विजय अहिरे (११अ), जीवन रायते (११ड) आणि शेखर देवरे (१३क) या उमेदवारांची निवडणुकीतील माघार घेण्यात आली आहे. या प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीतील संवाद त्यामुळे वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्य दाखवत आपल्या उमेदवारांची प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी माघार घेतली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची घोषणा झाली. मात्र यामध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्याने अडथळे आणले होते.

Ajit Pawar, Eknath Shinde
BJP criticism Akola : भाजप उमेदवार मटका किंग? ठाकरेंच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप; ‘खोटं ठरल्यास आमदारकी सोडणार!’

या पक्षाच्या 40 जणांना उमेदवारी देण्यात आली. यातील बारा प्रमुख ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. दोन दिवस चर्चा होऊ नये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी हेकेखोर भूमिका सोडली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती झाली आहे. त्या दृष्टीने सुनील तटकरे यांनी ऐन निवडणुकीच्या दोन दिवस आधी दाखविलेले सामंजस्य सहकारी पक्षाला सुखद धक्का ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com