Girish Mahajan News : धुळे मतदारसंघातून भाजपचे डॉ, सुभाष भामरे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या शक्तिप्रदर्शनाचे तोंड भरून कौतुक केले.
धुळे मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. ते तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत. त्यांच्या उमेदवारीला पक्षातून मोठा विरोध होता. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या शक्तिप्रदर्शनात डॉ. भामरे यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यासाठी पुरेशी ताकद लावल्याचे स्पष्ट झाले. बहुतांशी पदाधिकारी आणि सहकारी पक्षांचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आपण हमखास विजयी होऊ असा दावादेखील केला आहे.
ग्रामविकासमंत्री महाजन यांनी डॉ. भामरे Subhash Bhamre यांच्या रॅलीचे तोंड भरून कौतुक केले. जळगावला महायुतीच्या रक्षा खडसे (रावेर) Raksha Khadse आणि स्मिता वाघ (जळगाव) Smita Wagh यांच्या संयुक्त रॅलीपेक्षाही डॉक्टर भामरे यांची रॅली मोठी आहे. जळगावची रॅली दोन उमेदवारांची होती. धुळ्यात एकाच उमेदवारांनी एवढी मोठी महारॅली काढली. त्यामुळे जळगावची रॅली मला फिकी वाटू लागली आहे. या रॅलीतून डॉक्टर भामरे यांचे मताधिक्य किती फक्त याची चर्चा होत राहील.
मंत्री महाजन म्हणाले, मी धुळे महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपला 50 जागा मिळतील असा दावा केला होता. त्याप्रमाणे प्रत्यक्षात 50 जागा मिळाल्या माझ्या या दाव्याचा काही लोकांना राग आला होता मात्र मी बोललो ते खरे ठरले.
लोकसभा निवडणुकीत Loksabha Election सर्वांनी काम करून भाजपला जास्तीत जास्त मतदान होईल, असे पाहिले पाहिजे. यंदा डॉ. भामरे यांना 3.32 लाख मताधिक्य मिळेल, असा माझा विश्वास आहे. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चार लाख बत्तीस हजार मताधिक्य मिळेल, अशा घोषणा दिल्या. त्यात हस्तक्षेप करीत महाजन म्हणाले, 4.32 लाख मताधिक्य मिळाले तर जळगाव दुसऱ्या क्रमांकावर जाईल म्हणून धुळ्यातून डॉ. भामरे 3.32 लाखांच्या मताधिक्यांनीच निवडून येतील यासाठी सर्वांनी मेहनत घ्या.
मंत्री महाजन यांनी धुळे मतदारसंघाविषयी Dhule Constituency केलेल्या या भाकितामुळे खरोखरच डॉ. भामरे यांना तेवढे मताधिक्य मिळेल का? याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांत सुरू झाली. त्यामुळे मंत्री महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून चर्चेत असतात. आता ते भविष्यवाणी देखील ठरणार का? असे त्यांचे समर्थक बोलताना दिसले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.