Women's Atrocity: बालिकेवरील अत्याचाऱ्याने धुळे हादरले, संतप्त महिलांचा पोलिसांविरोधात निषेध मोर्चा

Women protest against police Dhule: सोनगीरला तीन वर्षीय बालीकेवरील अत्याचार; संतप्त महिलांची आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी.
Womens agitation at Songir (Dhule)
Womens agitation at Songir (Dhule)Sarkarnama
Published on
Updated on

Dhule crime against minor: सोनगीर (धुळे) येथे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने गेले कोही दिवस धुळेवासीय संतप्त आहेत. या घठनेने शहर हादरले. शहरातील राजकीय पक्ष आणि महिला संघटनांनी त्यावर संताप व्यक्त केला.

धुळे शहर आणि परिसरात वाढती गुन्हेगारी नागरिकांच्या चिंतेचा विषय आहे. विशेषता महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेगारी नियंत्रित करण्याची मागणी होत आहे.

सोनगीर येथे तीन वर्षाच्या बालिकेवर शेजारीच राहणाऱ्या काकाने अत्याचार केला. या घटनेने आधीच संतप्त असलेला नागरिकांमध्ये नाराजीची भर पडली. भाजप महिला नेत्यांनी या विरोधात आवाज उठवला आहे.

Womens agitation at Songir (Dhule)
Malegaon Politics : निवडणुकीआधीच CM फडणवीसांनी मान्य केला पहिला पराभव : म्हणाले, 'एकमेव' महापालिका जिंकायला अवघड!

या संदर्भात महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होईल यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी. कात्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Womens agitation at Songir (Dhule)
ST Bus Driver Suicide : चालकाने एसटी बसमध्येच घेतला गळफास; एसटी महामंडळात खळबळ...

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे, माजी सभापती पंकज कदम, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपाळकर, प्रभादेवी परदेशी आदींसह शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाले. शहरातील रथ चौकापासून महिलांनी काळ्याफिती लावून हा आणि शेत मूक मोर्चा काढला.

पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना महिलांनी निवेदन दिले. महिला अत्याचाराच्या घटना शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान आहे. या गुन्ह्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत दया मिळता कामा नये. या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून धुळे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. अंमली पदार्थाच्या तस्करीसह अनाधिकृत दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेगारी नियंत्रणात आणावी. याबाबत कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com