Collector Transfer : जलज शर्मा झाले नाशिकचे नवे जिल्हाधिकारी!

Dhule collector Jalaj Sharma will be Nashik Collector-नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन यांची डी. मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्तपदी बदली
Jalaj Sharma & Gangatharan D.
Jalaj Sharma & Gangatharan D.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Collector: गेले तीन महिने बदलीसाठी प्रयत्नशील असलेले नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची काल सायंकाळी बदली झाली. धुळ्याचे जलज शर्मा नाशिकचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. (Gangatharan D. got transfer after three months waiting)

धुळ्याचे (Dhule) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांची नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची मुंबई (Mumbai) महापालिकेत बदली झाली आहे.

Jalaj Sharma & Gangatharan D.
Devendra fadanvis'न वर Eknath Khadse'न चा हल्लाबोल | NCP | BJP | Cabinet Expansion | Sarkarnama

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली होणार अशी चर्चा गेले तीन महिने सुरु होती. या बदलीला अखेर काल मुहूर्त लागला. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीचे आदेश काल निघाले. त्यांची मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी बदली झाली आहे.

गंगाथरन डी. कौटुंबिक अडचणींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बदलीसाठी प्रयत्नशील होते. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या बदलीच्या बातम्या आल्या होत्या. नाशिक महापालिकेच्या रिक्त असलेल्या आयुक्तपदी त्यांची बदली होईल असा देखील कयास बांधला जात होती. बदलीनंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी काम करताना समाधान मिळाले. विविध महत्त्वाचे निर्णय घेता आले. आदिवासी, कृषी तसेच विविध क्षेत्रात काम केले. त्यासाठी सगळ्यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

Jalaj Sharma & Gangatharan D.
Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या दौऱ्यातच अहमदनगर 'मनसे'तील दुही आली समोर

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले जलज शर्मा हे मुळचे चंदीगड येथील आहेत. भारतीय प्रशासन सेवेच्या २०१४ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी जळगावचे उपविभागीय अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com