Dhule Constituency 2024 : शोभा बच्छाव यांचा प्रचार जाणीवपूर्वक संथ? ; नेत्यांची तक्रार!

Congress candidate Shobha Bachhav : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी बाळासाहेब थोरातांना लिहिले पत्र
Dr. Shobha Bacchav
Dr. Shobha BacchavSarkarnama

Dhule Political News: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली होती. या नाराजीत भर टाकण्याचे काम बच्छाव यांच्या यंत्रणेकडून होतअसल्याचे चित्र आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचाराबाबत अनेक तक्रारी आहेत. काँग्रेसच्या प्रमुख नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबार येथे सभा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) आणि प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या कानावर देखील पदाधिकाऱ्यांनी हा विषय टाकला होता.

याबाबत पक्षाचे पदाधिकारी पुढे येऊन तक्रारी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे रविवारी रात्री धुळे येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर पटोले यांनी काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीवरून सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Shobha Bacchav
Nagar South Loksabha Constituency : श्रीगोंदे व पारनेरने वाढवली धाकधूक; नगर आणि शेवगावला लागल्या रांगा

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यानंतर आता महाविकास आघाडीचे सहकारी पक्षाच्या नेत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस उमेदवाराची यंत्रणा सांभाळणारे लोक जाणीवपूर्वक पदाधिकाऱ्यांची उपेक्षा करतात. आजवर कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतःहून संपर्क साधण्यात आलेला नाही. प्रचारासाठीची यंत्रणा आणि साहित्य याबाबतही अडचणी आहेत. त्यामुळे प्रचाराची यंत्रणा अद्याप गतिमान होऊ शकली नाही असे बोलले जाते.

यामध्ये भर घालणाऱ्या नवीन प्रकार पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) गटाचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिल्याचे बोलले जाते. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. थोरात यांच्याकडे यापूर्वीही विविध पदाधिकाऱ्यांनी संपर्क करून अडचणी सांगितल्या होत्या. त्याचे निराकरण किती प्रमाणात झाले हे समजू शकलेले नाही. मात्र एकंदर काँग्रेसच्या प्रचारातील विस्कळीतपणाचा लाभ भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले आहेत.

Dr. Shobha Bacchav
Jalgaon News : ...अन् शेतकरी संघटनेच्या जिल्ह्याध्यक्षांनी कांद्याची माळ घालून केलं मतदान, कारण काय?

धुळे लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान उमेदवाराविषयी अँटी इन्कमबन्सी आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात पक्षाचे अनेक लोक सहभागी झालेले नाही. इंडिया आघाडीने अर्थात भारतीय जनता पक्षाने(BJP) या निवडणुकीचे अतिशय नियोजनपूर्वक काम सुरू केलेले आहे. या उलट काँग्रेसचा उमेदवार अतिशय संथ गतीने काम करीत आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. मात्र उमेदवारांकडून होणाऱ्या उपेक्षेने काँग्रेस आणि सहकारी पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिंडोरी मतदार संघात पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com