Nagar South Loksabha Constituency : श्रीगोंदे व पारनेरने वाढवली धाकधूक; नगर आणि शेवगावला लागल्या रांगा

Loksabha Election 2024 : नगर शहरामध्ये विखे यंत्रणेने मतदान घडवून आणल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांची धाकधूक वाढली आहे.
Sujay Vikhe - Nilesh Lanke
Sujay Vikhe - Nilesh LankeSarkarnama

Nagar South Election News : नगर दक्षिण लोकसभा मतदान प्रक्रियेत सकाळी संथ गतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर वाढले. शेवगावमध्ये आणि नगर शहरात 43 टक्के मतदान झाले. तसेच राहुरीला 45 टक्के व कर्जत- जामखेडला 42 टक्के मतदान झाले होते. श्रीगोंदे 42 व पारनेर 34 टक्के मतदान झाले. या दोन्ही तालुक्यांतून काहीसा निरुत्साह दिसला. दुपारीपर्यंत या दोन्ही तालुक्यांतून कमी मतदान झाले होते. मतदारसंघात सरासरी 41 टक्के मतदान झाले होते.

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) व मविआचे माजी आमदार नीलेश लंके यांच्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार चुरस आहे. या मतदारसंघातून रिंगणात 25 उमेदवार असले तरी या दोन प्रमुख उमेदवारांसाठीच दोन्ही बाजूने बड्या राजकीय नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता होती. सोमवारी सकाळी पावसाळी वातावरण दूर होऊन सूर्य उगवल्याने व चांगले ऊन पडल्याने मतदार उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले.

Sujay Vikhe - Nilesh Lanke
Andhra Pradesh Election : आंध्रात वातावरण पेटलं; आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल..

पण श्रीगोंदे व पारनेर तालुक्यात सकाळी मतदानाला प्रतिसाद कमी होता. दुपारी तीन वाजेपर्यंत पारनेरला अवघे 34 टक्के तर श्रीगोंद्यात 42 टक्के मतदान झाले होते. यावेळेपर्यंत शेवगावला 43 टक्के, राहुरीला 45 टक्के, नगर शहरात 43 टक्के व कर्जत-जामखेडला 42 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र सर्वच मतदारसंघात मतदानाचा वेग वाढला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 10 लाख 32 हजार 946 पुरुष मतदार असून, 9 लाख 48 हजार 801 महिला मतदार आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत यापैकी 8 लाख 26 हजार 528 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुरीमध्ये मतदानाचा दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वाधिक मतदान झाल्याने तेथे मतदान घडवून आणण्याची चर्चा होती. हे मतदान नेमके कोणाला तारणार याचीही उत्सुकता लागली आहे. पारनेरमध्ये सर्वाधिक मतदान कमी झाले आहे त्यामुळे पारनेरच्या होम ग्राउंडवर नीलेश लंके यांची धाकधूक वाढली आहे.

शेवगाव आणि नगर शहरात चांगले मतदान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी वाढलेले मतदान संमिश्र असल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंदामध्ये दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला होता. तेथे सायंकाळपर्यंत टक्केवारी वाढेल, असा अंदाज आहे. श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत तगडी प्रचार सभा झाली होती.

Sujay Vikhe - Nilesh Lanke
Lok Sabha Election News : मोठी बातमी! ...म्हणून संदिपान भुमरे, सुजय विखे अन् वसंत मोरेंचं स्वत:ला मतदान नाही

कर्जत-जामखेडला ही चांगले मतदान झाले आहे. दुपारनंतर तेथेही मतदानाचा टक्का वाढेल, असे सांगितले गेले. शेवटच्या टप्प्यात भाजपचे आमदार राम शिंदे यांनी येथे जोर लावला होता. त्याच तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील तेथे जोर लावला होता. त्यामुळे इथून भाजप उमेदवार सुजय विखे यांना की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना लीड मिळणार का याची चर्चा होती.

नगर शहरामध्ये विखे यंत्रणेने मतदान घडवून आणल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीची यंत्रणा देखील येथे कार्यरत होती. परंतु तुलनेत विखे यंत्रणा अधिक वेगवान कार्यरत असल्याचे चित्र होते.

Sujay Vikhe - Nilesh Lanke
Shirur Lok Sabha Voting : मतदानाला तासभर बाकी असताना शरद पवारांच्या आमदाराने केली कार्यकर्त्यांना ही सूचना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com