Bhagirath Bhalke In Hyderabad : चार्टड विमानाने भगीरथ भालके चंद्रशेखर रावांच्या भेटीला; राष्ट्रवादीला मोठा धक्का !

Bhagirath Bhalke In Hyderabad : खास विमानाने भालके हैद्राबादेत पोहचले! राष्ट्रवादीचा उमेदवार केसीआरच्या गळाला..
Bhagirath Bhalke In hyderabad :
Bhagirath Bhalke In hyderabad : Sarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : पंढरपुरात (Pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे पोहचले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले होते. याच विमानातून आता ते हैद्राबादमध्ये दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेट घेणार आहेत. (Latest Marathi News)

Bhagirath Bhalke In hyderabad :
Sharad Pawar On Wrestler Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनावर शरद पवारांचं मोठे विधान; म्हणाले...

पंढपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके होते. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, आज ते चार्टर्ड विमानाने हैदराबादला येथे दाखल झाले आहेत.

Bhagirath Bhalke In hyderabad :
Sharad Pawar News : विरोधकांच्या एकजुटीबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचं निमित्त साधून भगीरथ भालके यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले.

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर अवघ्या चार दिवसांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून भगीरथ भालके यांना फोन आला होता. भालके यांनी पक्षात प्रवेश करावा, असे बीआरएसच्या नेतृत्वाकडून गळ टाकण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com