Dr Subhash Bhamare Politics: भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत धुळे मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे भामरे यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे. Dhule Loksabha Election 2024
धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे डॉक्टर भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षात मोठी नाराजी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या विरोधात नऊ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न बदलल्याने सध्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. या नाराजीचा सामना डॉ. भामरे यांना करावा लागत आहे. त्यासाठी लवकरच ते नाराज कार्यकर्त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे (Subhash Bhamare) यांच्याविषयी युतीतील नेतेच फारसे उत्साही नाहीत. मतदारसंघातील वातावरणदेखील केंद्र सरकारवरील नाराजी आणि अँटी इन्कमबन्सी यामुळे विरोधी काँग्रेस (Congress) पक्षाला अनुकूल असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम समीर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे वगळता तिसरे नाव समोर येत नाही. सक्षम उमेदवार म्हणून आमदार कुणाल पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकंदरच काँग्रेस पक्षाची स्थिती गोंधळलेली दिसते. अद्याप या पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याची वारंवार चर्चा होत आहे. Dhule Politics
काँग्रेस नेत्यांनी आत्मविश्वास गमावला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दबावातूनच आता ही जागा सक्षम उमेदवार असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात यावी, असादेखील एक मतप्रवाह आहे. भाजपला (BJP) या मतदारसंघात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही काँग्रेस पक्ष चाचपडत असल्याने महाविकास आघाडीच्या (MVA) अन्य घटक पक्षांनी सक्षम उमेदवार नसल्यास शिवसेनेचा पर्याय निर्माण केला आहे.
भाजपकडे (BJP) या मतदारसंघात निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, हर्षवर्धन दहिते, माधुरी बाफना, धरती देवरे, विलास बच्छाव, आदी उमेदवार इच्छुक होते. मात्र, पुन्हा डॉ. भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे मालेगाव येथे डॉक्टर भामरे यांच्या विरोधात फलक झळकवण्यात आले होते. अशीच घटना गुजरातमध्ये बडोदा मतदार (Badodara Constituency) संघातील भाजपच्या उमेदवार रंजना बेन भट यांच्याबाबत घडली होती. त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. भाजपला तेथे नवा उमेदवार जाहीर करावा लागला. धुळे मतदारसंघात (Dhule Matdarsangh) देखील त्याची पुनरावृत्तीहोते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. Maharashtra Latest News Politics
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.