Nitin Thackeray Lok Sabha News : नितीन ठाकरेंची आयडियाची कल्पना, शिवसेना उमेदवाराकडेच मागितला पाठिंबा!

Nashik Constituency Loksabha Latest Updates : नाशिकच्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या उमेदवारीसाठी चक्क शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराकडेच पाठिंबा मागितल्याने खळबळ उडाली आहे.
Nitin Thackeray
Nitin ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nitin Thackeray News: निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून करामती केल्या जातात. त्यात फारसे नावीन्य राहिलेले नाही. मात्र, नाशिकच्या एका इच्छुक उमेदवाराने आपल्या उमेदवारीसाठी चक्क शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराकडेच पाठिंबा मागितल्याने खळबळ उडाली आहे. Latest News on Maharashtra Politics

त्याचे झाले असे की, येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, महायुतीतील जागावाटपातील गोंधळात नाशिकच्या जागेबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. जागेचा निर्णय न झाल्याने आणि भाजपकडे इच्छुकांची संख्या वाढल्याने ठाकरे यांनी अन्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही सहकार्यांनी भाजपचा नाद सोडावा म्हणूनदेखील त्यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे ॲड. ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ॲड. नितीन ठाकरे (Nitin Thackeray) यांनी संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह नुकतीच शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली. मात्र, पवार यांनी संबंधित मतदारसंघ शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे आपण शिवसेना नेत्यांशी संपर्क करावा, अशी सूचना केली. ठाकरे यांच्या सहकार्यानेदेखील शिवसेना (Shivsena) नेत्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात काही अडचणी आल्या, त्यामुळे नितीन ठाकरे यांना शिवसेना नेत्यांची संपर्क करणे शक्य झाले नाही.Election Campaign Strategies

Nitin Thackeray
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये यंदा भुजबळांचे 'ओबीसी' कार्ड चालणार?

दरम्यान, ठाकरे यांच्या काही सहकाऱ्यांनी सिन्नर येथील एका संचालकाच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झालेल्या उमेदवाराशी संपर्क केला. त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर झालेल्या चर्चेत संबंधित उमेदवाराने ठाकरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी आपल्या पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. संबंधित उमेदवारांनी त्याला नकार दिला. मी शिवसेना ठाकरे (ShivsenaUBT) गटाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवेन. उमेदवारी न मिळाल्यास पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करील. मात्र, तुम्हाला पाठिंबा देण्याचा विषय आमच्या शिस्तीत बसत नाही. आपण आमच्या वरिष्ठ नेत्यांची जरूर भेट घ्यावी, असे त्यांनी सांगितल्याचे कळते. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने सिन्नरला (Sinnar) गेलेल्या या इच्छुक उमेदवारांची निराशा झाली.

संबंधितांनी शनिवारी मुंबई येथे एक शिवसेना (Shivsena) नेत्याची भेट घेतल्याचे कळते. या भेटीनंतर संबंधितांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेतल्याचे कळते. मात्र, या सर्व भेटीतून नेमके काय घडले आणि उमेदवारीबाबत काय शब्द मिळाला. हे समजू शकले नाही. एकंदरच इच्छुक उमेदवाराकडून आपल्या उमेदवारीसाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, थेट प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराकडेच पाठिंबा मागणे आजवर क्वचितच घडले असेल. नाशिकमध्ये (Nashik) यंदा ते घडल्याने तो मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

R

Nitin Thackeray
Prakash Ambedkar : वंचितची भूमिका गुलदस्तात, प्रकाश आंबेडकर लवकरच अर्ज भरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com