Nashik Municipal Election : 'तुला गायबच करतो...' विरोधात प्रचार केला म्हणून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची बांधकाम कंत्राटदाराला धमकी, थेट घरात घुसून धक्काबुक्की

Nashik Municipal Election 2026 Controversy : महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शहरात अनेक ठिकाणी राजकीय तसेच वादविवादाच्या घटना घडल्या. पंचवटी येथे भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेले कमलेश बोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने बोडके यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली.
Nashik civic polls controversy
Nashik civic polls controversySarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 15 Jan : मतदानाच्या पूर्वसंध्येला शहराक विविध राजकीय घडामोडी आणि वाद झाले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी परस्परांवर आरोप केले. पोलिसांमध्ये तक्रारीही दाखल झाल्या.

महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शहरात अनेक ठिकाणी राजकीय तसेच वादविवादाच्या घटना घडल्या. पंचवटी येथे भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेले कमलेश बोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने बोडके यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली.

या संदर्भात बांधकाम कंत्राटदार मनोज भागीरथ मुंडावरे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्या विरोधात प्रचार केला म्हणून संतापलेल्या माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी धमकी दिली. तसेच त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

Nashik civic polls controversy
BMC Voting : 'व्होटी चोरी', दुबार मतदारांना रोखण्यासाठी ठाकरे बंधूंचा 'भगवा गार्ड', मतदार केंद्राबाहेर काय रणनीती?

शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके हे आपल्या साथीदारांसह काल दुपारी मुंडावरे यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांच्या समवेत निलेश घुगे, वृषभ दिघे, मयूर बोडके, नितीन शेळके होते. त्यांनी माझ्या विरोधात प्रचार का करतो? असे धमकावत धक्काबुक्की केली.

त्यानंतर घराच्या बाहेर उडून गाडीमध्ये मधल्या सीटवर बसवले. सिल्वर रंगाच्या गाडीमध्ये बसून अपहरणाचा प्रयत्न केला. तुला चार दिवस गायब करून टाकतो. आमच्या नादाला लागू नको. त्यानंतर उमेदवार बोडके यांनी कॉलर पकडून तुला सहा महिने फिरू देणार नाही. असे गायब करू की कोणाला कळणारही नाही. आमच्या नादाला लागल्यावर काय होते हे माहित आहे का? अशा विविध धमक्या दिल्याचंही तक्रारीत म्हटले आहे.

Nashik civic polls controversy
Baramati Election: बारामतीत राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग; नेमका काय झाला फायदा?

बुधवारी जाहीर प्रचार बंद असल्याने विविध उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अनेक ठिकाणी वाद झाले. विशेषता प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या समर्थकांना धमकावण्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी आल्या. मतदानाच्या एक दिवस आधीच शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. कमलेश बोडके हे माजी नगरसेवक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com