Dilip Khedkar Navi Mumbai kidnapping case : अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, 'काहीतरी काळबेरं, षडयंत्र आहे, हे निश्चित'!

Retired IAS Dilip Khedkar Speaks on Navi Mumbai Kidnapping : नवी मुंबईतील अपहरण प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांनी अहिल्यानगर इथं प्रेस घेत बाजू मांडली.
Dilip Khedkar anticipatory bail
Dilip Khedkar anticipatory bailSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar latest updates : नवी मुंबईतून ट्रकवरील क्लिनरच्या अपहरण प्रकरणातील आरोपी निवृत्त IAS दिलीप खेडकर यांनी कारवाईवर मोठं भाष्य केलं. मुंबई उच्च न्यायालयाने दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दिलीप खेडकर यांनी, हा सर्व प्रकार खोटा असून पोलिस माझ्यावर दबावाखाली कारवाई करत आहेत. राजकारणा आल्यापासून माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचेही म्हटले.

दिलीप खेडकर यांनी आज अहिल्यानगर इथं पत्रकार परिषद घेऊन,नवी मुंबईतील (Navi Mumbai) अपहरण गुन्ह्यावर भाष्य केले. ते म्हणाले, "एखादी घटना झाल्यावर, तिला कसं प्रोत्साहित करता येईल. समोरच्याला कसा त्रास होईल. कुटुंबाला कसा त्रास होईल. निवडणुका जवळ आल्यावर महिना-महिना त्रास दिला जात आहे."

'अनेक घटना होतात. अपहरणाचा गुन्हा किरकोळ आहे, असे मला म्हणायचे नाही. पण एवढे खून, दरोडे, मारामाऱ्या होतात, त्याच्या बातम्या चालत नाही, तपास होत नाहीत. यांची एक टिम, 15 दिवस पुण्यात (Pune) तळ ठोकून होती. पोलिस सांगत होते की, आमची बाकी सर्व कामं ठप्प आहेत. एकंदरीत असं दिसतं की, यात काहीतरी काळबेरं आहे, षडयंत्र आहे, हे निश्चित!,' असा दावा दिलीप खेडकर यांनी केला.

Dilip Khedkar anticipatory bail
BJP vs Congress Bihar election : बिहारचं मैदान मोदी अन् राहुल कसं गाजवणार? कसं ठरलं सभाचं नियोजन...

'तसंच, हा सर्व प्रकार खोटा असून पोलिस माझ्यावर दबावाखाली कारवाई करत आहेत. मी राजकारणात आल्यापासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू झाले असून, निवडणूक जवळ आल्यावर असे प्रकार वाढतात,' असाही गंभीर आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

Dilip Khedkar anticipatory bail
Local Body Elections Maharashtra : लागा तयारीला! नगरपालिकेची नोव्हेंबरमध्ये घोषणा, डिसेंबरमध्ये मतदान; 'स्थानिक'च्या तयारीच्या आयोगाकडून हालचाली

नेमकं काय आहे प्रकरण

नवी मुंबईतील मुलुंड-आयरोली लिंक रोडवर 12 सप्टेंबरला 22 वर्षीय प्रल्हाद कुमार या ट्रक क्लिनरच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने चुकून दिलीप खेडकर यांच्या आलिशान गाडीला धक्का दिला. या घटनेनंतर, दिलीप खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने, प्रल्हाद कुमारला मारहाण करत गाडीत बसवले आणि पोलिस ठाण्यात नेतो, असे सांगून अपहरण केले. तसा नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी खेडकर यांच्या घरातून प्रल्हाद कुमारला सुरक्षित बाहेर काढले, तेव्हापासून खेडकर पसार होते. त्यांचा 6 ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता. मात्र 16 ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मनोरमा यांची भूमिका

दरम्यान, या अपहरण प्रकरणा दिलीप खेडकर यांची पत्नी मनोरमा ही देखील आरोपी आहे. तिला देखील जामीन मिळाला आहे. या प्रकरणात मनोरमा यांनी भाष्य करताना, मी कुठेही पळून गेलेले नव्हते, हे सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा पूर्वी केलेला आहे. दिलीप खेडकरांबाबत त्यांनी, मी त्यांच्याविषयी माहिती सांगू शकत नाही. करण माझा आणि त्यांचा संपर्क नाही. दिलीप खेडकर यांच्याशी घटस्फोट झाला आहे, असा दावा मनोरमा खेडकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com