Dilip Valse Patil on Chhagan Bhujbal : दिलीप वळसे पाटलांनी झटकली जबाबदारी; म्हणाले, छगन भुजबळांचे मला माहीत नाही!

Dilip Valse Patil : दिलीप वळसे-पाटलांनी झटकली जबाबदारी, म्हणाले, त्याबाबत मला माहीत नाही!
Dilip Valse Patil on Chhagan Bhujbal : दिलीप वळसे पाटलांनी झटकली जबाबदारी; म्हणाले, छगन भुजबळांचे मला माहीत नाही!
Sarkarnama
Published on
Updated on

Dilip Valse Patil on Chhagan Bhujbal : राज्य शासनाने मराठा आंदोलकांच्या मागणीवर आज निर्णय घेतला. त्याला भुजबळ यांनी प्रखर विरोध केला आहे. त्याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी अक्षरश: या प्रश्नाबाबत पळ काढला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याशी आज झालेल्या चर्चेत राज्य शासनाने कुणबी जातीचे दाखले आणि आरक्षण याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचे विविध स्तरावर स्वागत होत आहे. (Dilip Valse About Chhagan Bhujbal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Valse Patil on Chhagan Bhujbal : दिलीप वळसे पाटलांनी झटकली जबाबदारी; म्हणाले, छगन भुजबळांचे मला माहीत नाही!
Chhagan Bhujbal reaction after Maratha reservation decision : झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत...! भुजबळांचे ओबीसींना हरकती देण्याचे आवाहन...

यासंदर्भात आज नाशिकच्या दौऱ्यावर असलेले सहकारमंत्री वळसे-पाटील यांनी अतिशय त्रोटक आणि सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार पूर्वीपासून सकारात्मक होते. त्यामुळे हा निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयाचा मोठा फायदा मराठा समाजाला होईल.' (Dilip Walse patil)

यासंदर्भात छगन भुजबळ यांनी वेगळी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षरीत्या शासनाच्या या निर्णयाला असहमती दर्शविली आहे. त्याबाबत भुजबळ यांनी उद्या राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत ओबीसी नेते पुढील धोरण ठरविणार आहे. याविषयी वळसे-पाटील यांना विचारणा केली असता, माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे मला यावर काही बोलता येणार नाही. भुजबळसाहेब काय म्हणाले, याविषयी मला काहीही माहिती नाही, असे सांगत जबाबदारी झटकली. भुजबळ यांच्याबाबत वळसे-पाटील यांना पत्रकारांनी वारंवार विचारणा केली असता, त्यांनी याबाबत मौन राहणे पसंत केले आणि शेवटी या प्रश्नावर बोलण्याचे टाळत ते निघून गेले.

Edited By : Rashmi Mane

R...

Dilip Valse Patil on Chhagan Bhujbal : दिलीप वळसे पाटलांनी झटकली जबाबदारी; म्हणाले, छगन भुजबळांचे मला माहीत नाही!
Maratha Vs OBC Politics : महायुतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे Vs मंत्री भुजबळ

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com