Chhagan Bhujbal reaction after Maratha reservation decision : झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत...! भुजबळांचे ओबीसींना हरकती देण्याचे आवाहन...

Maratha reservation : एकमेकांवर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही प्रत्यक्ष कृती करावी लागेल.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation : सरकारमध्ये 'विदाऊट फियर अँड फेव्हर' काम करू, अशी आम्ही शपथ घेतो. कुणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ. कुणाला फेवर करणार नाही, अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळ घेतो. मग हा सरकारने एकाच बाजूने दिलेला निर्णय आहे. याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे. झुंडशाहीने अशाप्रकारे कोणतेही नियम, कायदे बदलता येत नसल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयावर दिली. (Chhagan Bhujbal reaction after Maratha reservation decision)

आज मुंबईत मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. यावर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी झुंडशाहीने कोणतेही नियम, कायदे बदलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Speech On Maratha Reservation : 'विजयी गुलालाचा अपमान होणार नाही...'; जरांगेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

भुजबळ म्हणाले, ही एक सूचना आहे, नोटीस आहे. याचं रूपांतर नंतर होणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत त्याच्यावर हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आणि इतर समाज तसेच जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून हरकती पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवून द्याव्यात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी समाजातील सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा या हरकती अशाप्रमाणे पाठवाव्यात, जेणेकरून सरकारला लक्षात येईल, याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे. दुसरंसुद्धा लोकांचं काही मत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत माझी विनंती आहे, नुसतं जे आहे ते एकमेकांवर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि त्या हरकती आम्ही आमच्या समता परिषदेच्या माध्यमातून विचार करून पुढची कार्यवाही करू.

मनोज जरांगे यांची सगळे सगे-सोयरे ही मागणी सरकाने मान्य केली असली तरी जे सगेसोयरे आहेत हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही. यामध्ये मराठा समाजालासुद्धा मला निदर्शनास आणून द्यायचे आहे की, ओबीसींचे जे शिल्लक आरक्षण राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळत आहे. तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत आहे. परंतु याची एक दुसरी बाजू आहे. ती तुम्ही लक्षात घ्या, यामध्ये जवळपास 80 ते 85 टक्के लोक येतील.

शेड्युल कास्ट वेगळी आहे. पण यामुळे इतर सगळे एकाच ठिकाणी येतील. इडब्ल्यूएसच्या अंतर्गत तुम्हाला जे 10 टक्के आरक्षण मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही. ओपनमध्ये जे 40 टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होते ते आता तुम्हाला मिळणार नाही. 50 टक्के आरक्षणामध्ये तुम्ही खेळत होता. त्यामध्ये 10 टक्के ईडब्ल्यूएस आणि उरलेले 40 टक्के, या 50 टक्केमध्ये तुम्हाला संधी होती.

ती संधी गमावून आता तुम्हाला त्यावर पाणी सोडावे लागेल आणि 17 टक्के शिल्लक असलेल्या आरक्षणात तुम्हाला झगडावे लागेल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे तुम्ही म्हणता, तरीसुद्धा तुम्ही मागच्या दाराने त्यामध्ये आला. पण त्याच्यामुळे तुम्ही जे 50 टक्क्यांमध्ये जी संधी होती. ती तुम्ही गमावून बसला आहात हेसुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

R...

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal On Maratha Reservation : 'हा अध्यादेश नाही, केवळ एक मसुदा; भुजबळांनी टाकले मराठ्यांच्या जल्लोषावर विरजण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com