Dindori constituency 2024: दिंडोरीचे वातावरण अनुकूल करण्यात नरेंद्र मोदींची सभा यशस्वी

Dr. Bharati Pawar : पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेला कामांमुळे मतदारांवर त्यांचा प्रभाव वाढलेला आहे. विविध राष्ट्रीय प्रश्न त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास वाढल्याचे बुधवारी झालेल्या सभेतून दिसून आले आहे.
Bharati pawar
Bharati pawarSarkarnama

Dr. Bharti Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव अद्यापही टिकून आहे. या सभेमुळे दिंडोरीमध्ये वातावरण महायुतीसाठी अनुकूल झाले आहे.

पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेविषयी दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी आज माहिती दिली.पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेला कामांमुळे मतदारांवर त्यांचा प्रभाव वाढलेला आहे. विविध राष्ट्रीय प्रश्न त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास वाढल्याचे बुधवारी झालेल्या सभेतून दिसून आले आहे.

शेतकर्‍यांचे प्रश्न तसेच कांदा निर्यात बंदी पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची सभा विशेष प्रयत्न करून आयोजित करण्यात आली होती. या सभेतून मोदी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आपले व्हिजन मांडले. कांदा निर्यात बंदी आणि कांद्याचे भाव टिकून राहावे यासाठी बफर स्टॉक करण्याबाबत पंतप्रधानांनी केंद्र शासनाचे (Central Government) व्हिजन मांडले. शेतकऱ्यांना ग्रीन इंडिया मूव्हमेंट अंतर्गत अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. त्याविषयी या सभेत सविस्तर सांगण्यात आले. त्याला शेतकरी आणि उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही सभा यशस्वी झाली याविषयी कोणतीही शंका नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bharati pawar
IAS Ananya Singh : 'मॉडेल' पेक्षा कमी नाही 'या' IAS अधिकारी, फोटो एकदा बघाच!

शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. केंद्र शासनाची शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही महत्त्वाची योजना आहे. त्यातून येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांना साठ हजार रुपये मिळण्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीतील अमृत काळामध्ये पाच महत्त्वाची कामे झाली आहेत. त्याचा लाभ सबंध देशाला होत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे एक लाख लोकांनी या सभेसाठी गर्दी केली होती. अयोध्येतील श्रीराम मंदिरांपासून (Ayodhya Ram Mandir) तर मोठ्या विकास योजना इथपर्यंतचे भाजपने केलेली कामे लोकांना भावली आहेत. सभेत उपस्थितांनी मोदी यांना दिलेला प्रतिसाद त्याचे प्रतीक होते. या सभेने दिंडोरी मतदार संघातील राजकीय वातावरण बदलले आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी झाली असून येत्या निवडणुकीत मतदानातून ते दिसून येईल. मतदार पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रश्नांवर मतदान करतील. त्या दृष्टीने मतदारसंघातील (Dindori Loksabha Election) राजकीय वातावरण बदलण्यात पंतप्रधान मोदी यांची सभा यशस्वी झाली, असा विश्वास उमेदवार डॉ भारती पवार यांनी व्यक्त केला.

Bharati pawar
Interim Bail : अंतरिम जामीन म्हणजे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com