Jiva Gavit News: लाल बावट्याचे कॉम्रेड जीवा गावित कोट्यधीश!

Loksabha Election : माझी आमदार गावित यांच्याकडे 1.07 कोटींची अचल संपत्ती आहे. यामध्ये सुरगाणा येथे साडेआठ हजार चौरस मीटरचा निवासी भूखंड आहे. अलंगुन (सुरगाणा), पंचवटी (नाशिक) आणि अंधेरी (मुंबई) येथे त्यांचे घर आहे.
CPM leader J. P. Gavit
CPM leader J. P. GavitSarkarnama

Dindori constituency 2024 : लाल बावट्याचे वादळ घेऊन वन जमिनींचा लढा लढणारे माजी आमदार जे. पी. गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांच्या संपत्तीचे सविस्तर विवरण आहे. आदिवासींच्या वनजमिनींच्या प्रश्नावर लढा उभारणारे माजी आमदार गावित यांच्याकडे तब्बल सहा गावांमध्ये 47 एकर 25 गुंठे जमीन आहे. यातील काही जमिनी त्यांनी वेळोवेळी खरेदी केल्या आहेत. या सर्व जमिनींची खरेदीची किंमत 26.13 लाख रुपये आहे.

CPM leader J. P. Gavit
Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज अपक्ष लढणार, नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत?

माजी आमदार गावित Jiva Gavit यांच्या संपत्ती गेल्या पाच वर्षे फारशी वाढ झालेली नाही, त्यांची संपत्ती 13.12 लाखांनी वाढली आहे. विविध मालमत्ता आणि उत्पन्नाच्या आधारे त्यांची एकूण चल संपत्ती 2 कोटी 36 लाख 40 हजार 800 रुपये आहे. 2014 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 2 कोटी 22 लाख 28 हजार 892 होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझी आमदार गावित यांच्याकडे 1.07 कोटींची अचल संपत्ती आहे. यामध्ये सुरगाणा येथे साडेआठ हजार चौरस मीटरचा निवासी भूखंड आहे. अलंगुन (सुरगाणा), पंचवटी (नाशिक) आणि अंधेरी (मुंबई) येथे त्यांचे घर आहे. गावित यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांचे सोने व अन्य दागिने आहेत. त्यांच्याकडे पाच लाख रुपये कॅश इन हॅन्ड आहेत. एक इनोव्हा कार आणि स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आदींचा त्यांच्या संपत्तीचा समावेश आहे.

दिंडोरीत तिरंगी लढत

दिंडोरीत भाजपकडून BJP भारती पवार, राष्ट्रवादी (शरद पवार गट) भास्कर भगरे आणि माकपचे जीवा पांडू गावित यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. गावित यांना उमेदवारी मागे घ्यावी म्हणून महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, गावित आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले.

(Edited By Roshan More)

R

CPM leader J. P. Gavit
Brij Bhushan Sharan Singh News : ब्रिजभूषण सिंहांना डबल झटका; एकिकडे आरोप निश्चिती होणार अन् पक्षही तिकीट कापणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com