Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज अपक्ष लढणार, नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत?

Nashik Loksabha :शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे. शिवाय महाराजांचे संभाजीनगरमध्ये असलेल्या भक्तांचे नातेवाईकदेखील नाशिकमध्ये असल्याने महाराजांना चार लाख मतं फिक्स असल्याचा दावा महाराजांच्या भक्त परिवाराकडून केला जात आहे.
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharajsarkarnama

Loksabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजूनही उमेदवारी घोषित झालेली नाही. महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आजपासून (शुक्रवार) नाशिक जिल्ह्याधिकारी कार्यालयातून इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज घेत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे Hemant godse यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहे. तर, राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज नेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, असा आग्रह करणारे शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Shantigiri Maharaj
Dr Bharati Pawar : सरकारच्या 'त्या' निर्णयाने भारती पवारांच्या अडचणी वाढणार

शांतीगिरी महाराज Shantigiri Maharaj यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. सर्व पक्षांनी मिळून आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू असल्याचेदेखील सांगत होते. मात्र, त्यांची नाव निश्चित होऊ शकले नाही. शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन

शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे. शिवाय महाराजांचे संभाजीनगरमध्ये असलेल्या भक्तांचे नातेवाईकदेखील नाशिकमध्ये असल्याने महाराजांना चार लाख मतं फिक्स असल्याचा दावा महाराजांच्या भक्त परिवाराकडून केला जात आहे. नुकताच बाबा परिवारकडून एक हजार युवकांचा समावेश असलेली बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

महायुतीत रस्सीखेच

नाशिक मतदारसंघावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारीवरील दावा मागे घेतला असला तरी राष्ट्रवादीतील इतर सक्षम उमेदवाराला उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेकडून आपल्यालाच उमेदवारी फिक्स आहे, असे सांगत असून त्यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे.

R

Shantigiri Maharaj
Supreme Court on NOTA : बिनविरोध विजयात ‘नोटा’ आडवे येणार? कोर्टाने निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com