Dindori Constituency : शरद पवारांना 'गिफ्ट'; भाजपच्या पराभवासाठी जे.पी.गावितांची माघार!

CPI(M) and Sharad Pawar : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी मतदार संघातून माघार घेत महाविकास आघाडीला दिला पाठिंबा
Dindori Constituency
Dindori ConstituencySarkarnama
Published on
Updated on

J. P. Gavit News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता या मतदारसंघातून महायुतीच्या प्रमुख बंडखोरांनी माघार घेतली आहे.

दिंडोरी मतदार संघाच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी मतभेद निर्माण झाली होते. महाविकास आघाडीने हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडला. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेले माकपचे माजी आमदार जीव पांडू गावित यांनी ही जागा आपल्या पक्षासाठी मागितली होती. त्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला होता.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील 48 पैकी एक असे दिंडोरी मतदार संघावर दावा सांगितला होता. मात्र त्याबाबत एक मत न होऊ शकल्याने या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने येथून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि भगरे यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे.

Dindori Constituency
Rohit Pawar : शरद पवारांचे 'ते' विधान अन् रोहित पवार भरसभेत रडले; बारामतीत नेमके काय घडले?

माजी आमदार गावित त्यांनी या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली होती. या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेऊन महाविकास आघाडीतील मतभेद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात माकपच्या वरिष्ठ नेत्यांची झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आला.

Dindori Constituency
Lok Sabha Election 2024 : 'सुप्रिया सुळे 4 जूननंतर दिसणार नाहीत'; तटकरेंच्या टीकेची धार वाढली!

दरम्यान याबाबत पक्षाचे राज्य सचिव डॉ उदय नारकर यांनी आज अधिकृत घोषणा केली. दिंडोरी मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माकप इंडिया आघाडीचा भाग असून राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या पराभवासाठी सर्व नेते एकत्रितपणे जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. माकपचे माजी आमदार गावित लवकरच आपली उमेदवारी मागे घेतील.

माकपचे गावित यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. माकपचे या मतदारसंघात सरासरी एक लाख मते आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये माकपने येथून माजी आमदार गावित यांना उमेदवारी दिली होती. यंदाही उमेदवारी नसल्याने त्याचा फटका भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज मोठा दिलासा मिळाला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com