Rohit Pawar : शरद पवारांचे 'ते' विधान अन् रोहित पवार भरसभेत रडले; बारामतीत नेमके काय घडले?

Baramati Lok Sabha Constituency : बारामतीतील मोरगाव रोडवरील लेंडी पट्टीतील मैदानावर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी सभा पार पडली.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. त्याच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. ५) शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाच्या बारामतीत सांगता सभा झाल्या. बारामतीतील मोरगाव रोडवरील लेंडी पट्टीतील मैदानावर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी सभा पार पडली.

यावेळी आमदार रोहित पवारांना भाजपच्या नेत्यांचे, अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांचे भाषणांचे व्हिडिओ लावले. तसेच पक्ष फुटला त्यावेळी तरुणांचे कल्याण केल्यानंतरच डोळे मिटेल, असे शरद पवारांचे विधान आठवल्याने रोहित पवारांना अश्रू अनावर झाले.

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी आम्ही काही पदाधिकाही पवार साहेबांसोबत होतो. ते टीव्ही पाहत होते मात्र दुःख चेहऱ्यावर दिसू दिले नाही. त्यावेळी त्यानी सांगितले तुम्ही काळजी करू नका. आपल्याला स्वाभीमानी महाराष्ट्र घडवायचा आहे. तो घडवत असताना किंवा तो घडवण्यासाठी आपल्याला नवी पिढी घडवायची आहे. आणि ती नवी पिढी जबाबदारी घेत नाही, किंवा त्या पिढीची जबाबदारी पेलण्याची क्षमता होत नाही, तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांचे शब्द होते. याची आठवण होताच रोहित पवारांना अश्रू अनावर झाले.

Rohit Pawar
Sushma Andhare News : देवेंद्र फडणवीसांविरोधात कट कारस्थान? सुषमा अंधारेंनी दोनच शब्दात विषय मिटवला

या सभेत रोहित पवारांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटलांचा Chandrakant Patil व्हिडिओ लावला. त्यात पाटलांनी पवारांना राजकारणातून नेस्तनाबूत करायचे आहे, असे विधान केले होते. रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी तुतारी दोनदा वाजवतात. एकदा लग्नात तर दुसऱ्यांदा शेवटच्या क्षणी. तर अजित पवार गटाचे नेते रविराज तावरे यांनी कोपरा सभेत मटका फोडला होता. या नेत्यांचा रोहित पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ही मंडळी शरद पवारांच्या मरणाची वाट पाहत असल्याचा आरोप केला. त्यांना धडा शिकवायची जबाबदारी तुमची आहे, असे म्हणत बारामती तालुक्यातून गेल्यावेळी पेक्षा जास्त लीड देण्याचे आवाहन रोहित पवारांनी केले.

Rohit Pawar
Jay Pawar Meet Manoj Jarange : मनोज जरांगे-जय पवार भेटीचं नेमकं गणित काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com