Lok Sabha Election 2024 : 'सुप्रिया सुळे 4 जूननंतर दिसणार नाहीत'; तटकरेंच्या टीकेची धार वाढली!

Sunil Tatkare News : अनेक धर्मीयांचा हा देश आहे. संविधानात तसं नमूद केलेलं आहे. पण, धर्माच्या नावावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अत्यंत व्यथित करणारा आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Kokan News : तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षीयांचे धुमशान सुरु आहे. दरम्यान राजकीय टीकाटिप्पणी - आरोप प्रत्यारोपांना उधाण येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

रायगडमध्ये लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीसाठी प्रचार करत असताना एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तटक म्हणाले, "आज संविधानाबाबत प्रश्न निर्माण केला जातो. अल्पसंख्यांक समाजाच्या मनात जाणीवपूर्वक विरोधकांकडून विखार निर्माण केला जात आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आपल्याला टिकवायचे आहे. अनेक धर्मीयांचा हा देश आहे. संविधानात तसं नमूद केलेलं आहे. पण, धर्माच्या नावावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अत्यंत व्यथित करणारा आहे. चार तारखेला चार नंतर सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबिय राजकीयदृष्ट्या पुन्हा दिसणार नाहीत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ
Lok Sabha Election 2024
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

शरद पवारांनी ठणकावले -

'सत्तेचा गैरवापर करून कुणी दमदाटी करत असेल तर जागा दाखवा. सत्तेचा माज काही लोकांना चढलाय. हा माज उतरवायला वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. जे लोक तुम्हाला दमदाटी करत असतील तर यत्किंचितही चिंता करू नका हा शरद पवार (Sharad Pawar) कायम तुमच्या पाठीशी कायम राहिल.', अशा शब्दात पवारांनी विरोधकांना ठणकावले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com